जे. पी. नड्डांची सभा संपताच लोकसभेसाठी "भाऊ की भैय्या" रंगली चर्चा #chandrapur


चंद्रपूर लोकसभेसाठी कुणाला मिळणार तिकीट?


चंद्रपूर:- भाजपने मिशन 144 ला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची तयारी सुरू असल्याची चर्चा समोर येत आहे. जे. पी. नड्डा यांची सभा संपली आणि जिल्हात भाजपा लोकसभेसाठी "भाऊ की भैय्या" ही चर्चा रंगली आहे.

त्यामुळे माजी खासदार हंसराज अहिर यांचा पत्ता कट होण्याची चिन्ह आहे. भाजपने "मिशन 144' ची घोषणा केली आहे. या मिशनची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे चंद्रपुरातून केली आहे. भाजपने हंसराज अहिर यांना मागासवर्गीय आयोगाचं राष्ट्रीय अध्यक्षपदावर बसविले आहे. त्यांना दिल्लीला पाठवलं. जे. पी. नड्डा यांनी केलेली मुनगंटीवार यांचे कौतुक बघता लोकसभा उमेदवारीची लॉटरी लागेल असं बोललं जातं आहे.

यावेळी जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपुरातील सभास्थळी सुधीर मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट करणारी चित्रफीत दाखवण्यात आली. चंद्रपूरच्या सभेत माजी खासदार हंसराज अहिर यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना प्रोजेक्ट केलं जातं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांना तिकीट मिळणार का? हे पाहण्याचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत