जे. पी. नड्डांच्या दौऱ्यादरम्यान गाड्या पार्किंगसाठी दीक्षाभूमीचा वापर #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर अतिशय संतापजनक व खेदजनक घटना घडली आहे. जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्यासाठी दीक्षाभूमीचा वापर पार्किंगसाठी करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

सोमवारी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा चंद्रपूर दौरा पार पडला. या दौऱ्यावेली जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत लोकांना व राजकीय पक्ष कार्यकर्त्यांसाठी दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंगची व्यवस्था चक्क चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर करण्यात आली.

हा संतापजनक प्रकार ज्या पवित्र भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली, त्या ठिकाणी घडला आहे. या प्रकारामुळे बौद्ध-आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी दीक्षाभूमी मुक्ती जनआंदोलन समितीचे मुख्य संयोजक प्रतीक डोर्लिकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूरच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा निषेध केला आहे.