अखेर त्या शेतकऱ्यांनी उपोषण घेतले मागे #chandrapur


शोभाताई फडणवीस यांनी घेतला पुढाकार

पालकमंत्र्यानीही दिले आश्वासन


पोंभूर्णा:- गेल्या पाच दिवसापासून आपल्या हक्काच्या मागण्या घेवून वेळवा माल,चेक वेळवा, सेल्लूर नागरेड्डी, चेक सेल्लूर येथील शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालयासमोल आमरण उपोषण करीत होते. सतत पाच दिवसापासून पोटात अन्नाचा घास घेतला नसल्याने उपोषण कर्त्याची प्रकृती ढासळत होती यातील वृद्ध उपोषणकर्ते शेतकरी नामदेव आत्राम यांची प्रकृती चिंताजनक होती.

त्यांना पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. याबाबत माहिती मिळताच माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी उपोषणकर्ते शेतकऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतला.

तालुक्यात वेळवा माल, वेळवा चक, सेल्लूर नागरेड्डी, सेल्लूर चक, येथील शेतकरी यांच्या शेतपिकांचे सततच्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते. मात्र पोंभूर्णा महसूल विभागाने या गावातील शेतकऱ्यांच्या शेतपिक नुकसानीची कोणतीही चौकशी न करता बोगस पंचनामे करुन हेतुपुरस्सर शासनाच्या मिळणाऱ्या निधी पासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले होते. शेतकऱ्यांनी आपल्या न्यायहक्कासाठी गेल्या पाच दिवसापासून तहसील कचेरी समोर आमरण उपोषण करीत होते. यादरम्यान एका वृद्ध शेतकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.बाकीच्यांचीही प्रकृती ढासळत होती.याबाबत माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी पोंभूर्णा येथे येऊन उपोषणकर्ते शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व उपोषण मागे घेण्यासाठी भाग पाडले.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी दुरध्वनीवरुन संवाद साधत शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

उपोषण कर्ते शेतकरी

दौलत फकीरा देवगडे, नामदेव तुकाराम आत्राम, वासुदेव किचय्या कावटवार, शामराव मारोती आत्राम, रामचंद्र मारोती कुंभरे, सुरेश हनुमान लोणारे, मधुकर रामा मेश्राम, सखाराम केशव कन्नाके अशी आठ शेतकरी बांधव उपोषण करीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत