मुलीच्या मैत्रिणीवर विकृतीचा कळस, नराधमाने घरी बोलावलं अन्......

Bhairav Diwase


नागपूर:- मुलीच्या मैत्रिणीला घरात एकटी बघून वडिलाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. विनोद (३५) असे नराधम आरोपीचे नाव आहे. तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.

हिंगणा हद्दीत एक मोलमजुरी करणारे दाम्पत्य राहते. आर्थिक परिस्थितीमुळे पिचलेल्यामुळे ते तीन मुलींना घरी सोडून बाहेर गावी मुक्कामी राहते. त्यांच्या घराशेजारी विनोदचे घर आहे. त्याच्या विकृत स्वभावामुळे त्याची पत्नी एका मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. तर तो ८ वर्षांच्या मुलीसोबत एकटा राहतो. त्याच्या मुलीसोबत खेळायला पीडित १० वर्षीय मुलगी घरी येत होती. त्याची वाईट नजर त्या मुलीवर गेली. त्यामुळे तो तिला नेहमी चॉकलेट किंवा खाऊ देऊन तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. तिचे आईवडिल घरी नसल्याचे बघून तिच्याशी तो बळजबरी करीत होता. १० वर्षीय मुलगी घरी एकटी होती. विनोद तिच्या घरी गेला. तिला दोन चॉकलेट दिले आणि तिच्यावर अत्याचार केला.

त्या दिवशी ती शिकवणी वर्गाला गेल्यानंतर तिने एक चॉकलेट मैत्रिणीला दिले. चॉकलेटबाबत विचारणी केली असता 'विनोद काकाने घाणेरडे कृत्य केले आणि चॉकलेट दिले' असे सांगितले. त्यामुळे शिकवणी वर्गाच्या शिक्षिकेने तो प्रकार मुलीच्या आईला सांगितला. त्यामुळे या प्रकाराला वाचा फुटली. त्यांनी विनोदला विचारणा केली असता त्याने माफी मागून प्रकरण मिटवून घेण्यासाठी विनंती केली. मात्र, मुलीच्या वडिलाने हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विनोदला अटक केली.