थरारक! पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा कुवेतवर 5-4 ने विजय; मैदानात चक दे इंडियाचे नारे #chandrapur #football #saffchampionship


श्वास रोखायला लावणाऱ्या सामन्यात भारताने कुवेतवर विजय प्राप्त केला आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने कुवेतचा पराभव करत saff championship चषकावर नाव कोरले.

भारताने 14 वर्षात नवव्यांदा saff championship चषकावर नाव कोरलेय. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने कुवेतचा पराभव करत saff championship चषकावर नाव कोरल्यानंतर चक दे इंडिया आणि वंदे मातरम् आवाजांनी मैदानात चाहत्यांनी आनंद साजरा केला.

दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपवर भारताने नवव्यांदा नाव कोरले आहे. बंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारताने बाजी मारली. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने कुवेतचा पराभव केला. पूर्ण वेळ तसेच अतिरिक्त वेळेतही सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटनंतर सडन डेथमध्ये लागला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेर भारतीय संघाने 1-1 (5-4) असा विजय मिळवला.

बेंगलोर येथे झालेल्या सामन्याच्या दोन्ही हाफमध्ये भारत आणि कुवेत संघाने प्रत्येकी एक एक गोल केला होता. 90 मिनिटानंतर कोणत्याही संघाला बाजी मारता आली नाही. त्यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आला. पण त्यामध्येही दोन्ही संघाला गोल करता आला नाही. सामना अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. कर्णधार सुनिल छेत्री याने पेनल्टीमध्ये गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. कुवेतनेही जोरदार पुनरामन करत 3-3 अशी लढत दिली होती. पण दबावात भारतीय खेळाडूंनी आपला खेळ उंचावला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतानेही 5-4 च्या फरकाने विजय मिळवला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने