राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदी आसिफ सय्यद यांची नियुक्ती
राजुरा:- विश्राम गृह राजुरा येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) आढावा बैठकीचे अध्यक्ष पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी आसिफ सय्यद यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
राज्यात शिवसेना प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले असून आपल्या पक्षा अंतर्गत बांधणी सुरू आहे. त्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा येथिल विश्राम गृह येथे बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी युवा नेते आसिफ सय्यद यांची तालुका अध्यक्ष (शरद पवार गट)म्हणून निवड करण्यात आली.
या बैठकीत पक्षाची भूमिका तथा पक्षाच्या संघटन वाढीसाठी चर्चा करण्यात आली.
त्यावेळी प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, युवक विधानसभा अध्यक्ष कुणाल गायकवाड़, पक्ष विधानसभा निरीक्षक रफीक नीजामी , झहीर खान, राजेंद्र शेगरी, स्वप्निल बाजूजवार, अजय ढूमने, उमेश दुर्गे, साहिल शेख, श्रीनिवास मिसलवार, निखिल मुसळे, पंकज करमरकर, समीर सय्यद, रमीज बेग, अभी सुर्यवंशी, मुनावर शेख, प्रशांत तोगरे, तुषार येमूलवार, शाहीन सय्यद यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत