Click Here...👇👇👇

ते" महामार्गावरील जिवघेणे खड्डे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने बुजविले.

Bhairav Diwase

̊ ते" महामार्गावरील जिवघेणे खड्डे महाराष्ट्र
राज्य मराठी पत्रकार संघाने बुजविले.


चंद्रपूर:- चंदपूर  गडचिरोली  महामार्गावरील खडडे बुजवून अखेर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकारी  यांनी या राज्य महामार्गावरून चालणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे.

गत अनेक महिण्यापासून या महामार्गावर मूल शहरापासून १५ कि.मी.अंतरावर मोठ मोठे खडडे पडल्याने यात अनेक दुचाकीधारकांना अपघात होऊन गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला आहे.यासंबधाने मूल येथील सा.बा.विभागाने वारंवार महामार्ग विभागाकडे या संबंधाने सदर खडडे 
बुजविण्यासाठी  पाठपुरावा करूनही उपयोग झाला नाही.

राज्य पत्रकार संघाचे जिल्हा पदाधिकारी  मनिष रक्षमवार यांनी चार दिवसाआधी या खडडयात पडून जखमी झालेल्या कुटूंबियांना स्वता उपचारासाठी आपल्या वाहनातून रुग्णालयांमध्ये पोहोचविले. गंभिरता लक्षात घेऊन विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांना संघटनेतफै पुढाकार घेऊन सदर जिवघेणे खडडे  बुजविण्यासाठी पुढाकार  घेण्याची मनिषा बोलून दाखविली. मूल तालुका संघाने पुढाकार घेतला. एम.आय.डि.सी.मधील राजुरी स्टिल अलाॅय इंडिया प्रा . लि .  कंपनिच्या सहभागाने अखेर महामागांवरील जिवघेणे खडडे बुजविण्यात आले. मनिष रक्षमवार, तालुका अध्यक्ष  सतीश राजुरवार, संघटक धर्मेंद्र सूत्रपवार, सरचिटणीस 
राजेंद्र वाढई  यांचे मार्गदर्शनात अखेर जिवघेणे खडडे बुजले. सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या महामागांवरून जिल्याचे पालकमंत्री, राज्याचे विरोधी पक्ष नेते ,अधिकारी  येरझारा मारतात यांना मात्र सदर जिवघेणे खडडे का दिसत नसावेत हे कळायला वाव नाही.
राज्य पत्रकार संघाचे सदस्य, पदाधिकारी बरेचदा स्वता पुढे येऊन प्रशासन, जनता यांना प्रत्यक्ष मदत करतो हे पुन्हा ऐकदा यातून स्पष्ट झाले आहे.