जिवती:- अती दुर्गम भाग म्हणुन ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील ग्रामिण भाग नायवाडा येथिल जल जिवन मिशन अतंर्गत विहीर बांधकामाला गेल्या 20 मे 2023 ला उद्घाटन करुन खोदकामाला सुरुवात सुरुवात करण्यात आली होती. मात्र सात फिट गड्डा मारुन ठेकेदार पसार झाले. त्या बद्दल गावकऱ्यांनी सबंधीत अधिकाऱ्यांना वेळोवेळी तक्रार केल्याने एप्रील 2024 ला पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली व पुन्हा तेरा फिट गड्डा मारुन ठेकेदार पसार झाला आहे. या बांधकामाला गेल्या दोन वर्षापासुन मुहुर्तच मिळत नाही आहे हा बांधकाम तत्काल पुर्ण करण्यात यावा करीता सोरेकसा ग्रामपंचायतचे सरपंच सागर कोटनाके व सदस्य तथा आपचे तालुका अध्यक्ष सुनिल राठोड यानी 11/03/2024 ला गटविकास अधिकारी जिवती व उप कार्यकारी अभियंता जिवती यांना निवेदनाद्वारे मागणी केली सोबतच 14/03/24 ला मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब,उप मुख्यकार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रपुर यांना निवेदन देण्यात आले तरीही कामाला पुर्ण करत नसल्याचे चित्र दिसत आहे वेळोवेळी भ्रमणध्वनीवर व्दारे मुख्यकार्यकारी अभियंता व उप मुख्यकार्यकारी अभियंता याच्याशी संपर्क साधुन कामाला सुरुवात करण्यात यावी अशी मागणी करताना यांचे उडवा उडवीचेच उत्तर मिळत असल्याचे ग्रामवाशीयांचा आरोप आहे सदर कामात शासकीय अधिकारी का बोलत नाही यांच्याशी मिलीभगत तर नाही असा आरोप गावकऱ्यांनी करत आहे
"त्या" विहीर बांधकामाला दोन वर्षा पासुन मुहुर्तचं मिळेना? #Chandrapur #Jivati
गुरुवार, मे ३०, २०२४