T20 World Cup : क्रिकेटप्रेमींचा नादच खुळा #chandrapur #T20worldcupwinner

Bhairav Diwase
T20 विश्वचषक जिंकल्यानंतर तरुणांचा चंद्रपुरात जल्लोष

चंद्रपूर:- T20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. शेवटच्या काही षटकात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावला. टीम इंडियाने तब्बल १७ वर्षांनी T20 विश्वचषक जिंकण्याचा विक्रम केला आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह गगनात मावेनासा झाला आहे.

T20 विश्वचषक जिंकल्यानंतर तरुणांचा चंद्रपुरात जल्लोष

T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवला. अटीतटीच्या ठरलेल्या या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत विश्वचषकावर नाव कोरलं. यानंतर चंद्रपूरातील तरुणांनी रस्त्यावर उतरत जल्लोष साजरा केला आहे. चंद्रपूरतील जटपुरा गेट परिसरात शेकडो क्रिकेटप्रेमी एकत्र आले. त्यानंतर या क्रिकेटप्रेमींनी नाचत फटाक्यांची आतिषबाजी करत विजयाचा जल्लोष केला.