मुल:- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे लॉज मध्ये एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वणी शहरातील रवी नगर परीसरात वास्तव्यास असलेल्या 45 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक 29 जूनला उघडकीस आली.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव सुनील देरकर (45) असे आहे. ते वणी येथील रवी नगर परिसरात वास्तव्यास होते. ते पूर्वी वेकोली मध्ये कर्तव्यावर होते मात्र त्यांनी नोकरी सोडून शेती व ब्रोकरशीप मध्ये स्वतःला व्यस्त केले होते. ते तीन दिवसांपासून बसस्थानकला लागून असलेल्या न्यू उपाध्यक्ष लॉज मधे थांबले होते असे बोलले जात आहे. आत्महत्या की घातपात? याबाबत पारिवारिक मंडळींनी संशय व्यक्त केला असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही. पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.