List of Shiv Sena candidates announced: शिवसेनेच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर


मुंबई:- विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने त्यांच्या पहिल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवार आहेत, तर दर्यापूरमधून अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


माहिममधून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. मनसेने काही वेळापूर्वीच त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली, ज्यात राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे यांना माहिममधून तिकीट देण्यात आलं आहे, त्यामुळे शिवसेनेने माहिममधून अमित ठाकरेंच्या विरोधात सदा सरवणकर यांना मैदानात उतरवलं आहे.



भाजपप्रमाणेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही बहुतेक सगळ्या विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे. राजापूरमधून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना तिकीट मिळालं आहे. तर उदय सामंत हे रत्नागिरीमधून निवडणूक लढणार आहेत.