Top News

भाजपाने केले आज पोंभुर्णा येथील शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात वृक्षारोपण.

कार्यक्रमाचे प्रमुख नितु चौधरी जि.प.सदस्या चंद्रपूर या होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षारोपण कार्यक्रमाच आयोजन.
Bhairav Diwase.    July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यामंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आजचा दिवस कृषीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्याचे माजी वनेमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी हरित महाराष्ट्राचा संकल्प करून मागील सरकारच्‍या कार्यकाळात तीन वर्षात विक्रमी ५० कोटी वृक्ष लागवड करून हिरवेगार महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले. यंदा याच धर्तीवर आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात आज ठिकठिकाणी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पडले.
 पोंभुर्णा भाजपा कडुन पोंभुर्णा येथील शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आज वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख नितु चौधरी जि.प.सदस्या चंद्रपूर या होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



 मागील सरकारच्‍या कार्यकाळात तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प करत हरीत महाराष्‍ट्र ही संकल्‍पना राबविणारे व राज्‍यात विक्रमी वृक्ष लागवड करणारे राज्‍याचे माजी वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयात दिनांक 1 जुलै रोजी वृक्षारोपण करण्‍यात आले. 
      हरीत महाराष्‍ट्र ही संकल्‍पना राबविण्‍याच्‍या दृष्‍टीने राज्‍यात तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवड करण्‍याचा निर्धार जाहीर केला होता. सन 2016 मध्‍ये 1 जुलै 2016 रोजी एकाच दिवशी 2 कोटी वृक्षलागवड करण्‍याचे त्‍यांनी जाहीर केले होते. वृक्षारोपणाच्‍या या मोहीमेला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्‍यात 2 कोटी 83 लक्ष इतकी वृक्षलागवड करण्‍यात आली. त्‍यानंतर 2017 मध्‍ये 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत 4 कोटी वृक्षलागवडीचा संकल्‍प करण्‍यात आला होता. यावेळी सुध्‍दा 5 कोटी 43 लक्ष झाडे राज्‍यात लावण्‍यात आली. सन 2018 मध्‍ये 1 जुलै ते 30 जुलै 13 कोटी वृक्षलागवड करण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला होता. या संकल्‍पाच्‍या पुर्तेतेसाठी सुध्‍दा जनतेचा लक्षणीय सहभाग लाभला व राज्‍यात 15 कोटी 88 लक्ष वृक्षलागवड करण्‍यात आली. या विक्रमी वृक्षलागवडीची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुध्‍दा मन की बात या कार्यक्रमात या मोहीमेचे कौतुक केले.

       या वृक्षलागवड कार्यक्रमाला गजानन गोरटींवार अध्यक्ष भाजपा पोंभुर्णा, श्वेता वनकर अध्यक्ष,न.पं पोंभुर्णा, रजिया कुरेशी उपाध्यक्ष, न.पं.पोंभुर्णा, महेश रनदिवे, अजित  मंगळगीरीवार नगरसेवक, मोहन चलाख नगरसेवक, ज्योती बुंराडे उपसभापती प.स पोभुर्णा, गंगाधर मडावी पं.स.सदस्य, सुनिता मॅकलवार नगरसेविका, नेहा बघेल नगरसेविका, शारदा कोडापे नगरसेविका, दिलिप मैकलवार,लक्ष्मण गव्हारे, अजय मस्के युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाजपा, सुनील कटकमवार, आदित्य तुम्मलवार महामंत्री भा.ज.पा युवा मोर्चा पोंभुर्णा, संजय कोडापे, राजु ठाकरे, राहूल वासेकर, अजित जंबुलवार, महेद्र सोनुले व सर्व पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने