Top News

मुल पंचायत समिती इमारतीसाठी सोलरवर आधारित विद्युत व्‍यवस्‍था उभारणार :- आ. सुधीर मुनगंटीवार.

मुल पंचायत समितीच्‍या इमारतीत कर्मचा-यांसाठी वाचनालयाचे उदघाटन.

आमदार निधीतुन 10 संगणक व पुस्‍तके उपलब्‍ध करणार.
 Bhairav Diwase.    July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- पंचायत समिती मुलच्‍या इमारतीत कर्मचा-यांसाठी वाचनालयाची संकल्‍पना ही अतिशय अभिमानास्‍पद व कौतुकास्‍पद आहे. या उपक्रमासाठी माझ्या आमदार निधीतुन मी 10 संगणक उपलब्‍ध करून देणार असून या वाचनालयासाठी पुस्‍तके सुध्‍दा उपलब्‍ध करणार आहे. मुल पंचायत समिती इमारतीसाठी सोलारवर आधारित विद्युत व्‍यवस्‍था सुध्‍दा लवकरच उभारण्‍यात येईल, अशी घोषणा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
 
दिनांक 1 जुलै रोजी पंचायत समिती मुल येथील इमारतीत कर्मचा-यांसाठी तयार करण्‍यात आलेल्‍या वाचनालयाचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, संवर्ग विकास अधिकारी कपील कलोडे, उपसभापती घनश्‍याम जुमनाके, माजी सभापती पुजा डोहणे, नगर परिषदेचे उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी पंचायत समिती परिसरात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण सुध्‍दा करण्‍यात आले.
 
*मुल नगर परिषदेने बांधलेल्‍या गाळयांच्‍या चाव्‍यांचे लाभार्थ्‍यांना वितरण*
 
या कार्यक्रमानंतर मुल नगर परिषदेने 12 व्‍या वित्‍त आयोगाच्‍या निधीअंतर्गत बांधलेल्‍या गाळयांचे चावी वितरण लाभार्थ्‍यांना करण्‍यात आले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी लाभार्थ्‍यांना चाव्‍या सुपुर्द करत व्‍यवसायासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, मुलच्‍या नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, मुख्‍याधिकारी श्री. सरनाईक, नगर परिषदेचे उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, महेंद्र करकाडे, अजय गोगुलवार, चंद्रकांत आष्‍टनकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. राजेश व्‍यास, स्‍वराज संतोषवार, अंजली गणवीर, संदीप निकुरे, आरजु गणवीर, जगदीश कळसकर, मंजुषा सेलेकर, गजानन मेकाम, रचना गेडाम या लाभार्थ्‍यांना गाळयांच्‍या चाव्‍यांचे वितरण करण्‍यात आले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने