तेलंगाना येथे उभारण्यात येत असलेल्या इंडस्ट्रीयल कॉरीडॉरमध्ये चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यांच्या समावेश करण्यात यावा:- आ. किशोर जोरगेवार

Bhairav Diwase
आमदार किशोर जोरगेवार यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निवेदनाद्वारे मागणी.
Bhairav Diwase.    July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- तेलंगाना राज्य सरकारने केंद्र शासनाच्या मदतीने महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागाला लागून इंडस्ट्रीयल कॉरीडॉर उभारण्याची प्रक्रिया सुरु केली आहे त्यामुळे या कॉरीडॉर अंतर्गत येत असलेल्या तेलंगानातील जिल्हांच्या विकासाला चालना मिळणार आहे. हि बाब लक्षात घेत तेलंगाना राज्याच्या सिमेला लागूण असलेल्या  चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या जिल्हांच्या विकासासाठीसुध्दा सदर  प्रकल्पात या तिन जिल्हांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना केली आहे.