Top News

भाऊ गगन भरारी घ्या..!

श्रीकांत मलोझलवार ह्यांचे आ. सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या वाढदिवसानिमित्त भावपुष्प.


निर्मिती आणि नेतृत्वाचा थेट संबंध दृष्टीकोन, अभ्यास, संस्कार आणि महत्वकांक्षेशी असतो. तुमच्या नेतृत्वाकडे हे गुण नसतील तर मग असामान्य असे काही घडत नाही. राजकीय पटलावर अनेकांचा उदय होतो. मात्र त्यामध्ये काहीच लोक लक्षात राहतात. हे जे लक्षात राहणे असते… ते दृष्टिकोन, अभ्यास,संस्कार आणि महत्त्वाकांक्षेशी जोडले असते.

राज्याचे माजी अर्थमंत्री, भाजपचे जेष्ठ नेते आणि संपूर्ण महाराष्ट्राचे भाऊ म्हणून ओळखले जाणारे सुधीर भाऊ यांची ओळख देखील विकासालाच आपला जनसंपर्क, जनसंवाद माणणारा नेता म्हणून आहे. जात, पात,धर्म, पंथ,भाषा, प्रदेश, सत्ता,अर्थकारण, गट -तट यापलीकडे जाऊन अंत्योदयाचा आपला परिपाठ असाच अविरत सुरू असावा यासाठी महाराष्ट्रातील चांदा ते बांदा पर्यंतच्या जनतेच्या वाढदिवसाला आपणास शुभेच्छा आहेत.

निवडणुकांचे समीकरण जातीय आधार, विचारधारा आणि कार्यकर्त्यांच्या फळीवर अवलंबून असते. त्यामुळे भारतीय राजकारणात कर्तुत्व आणि दृष्टिकोन कायम मागे पडलेला दिसतो. मात्र लोकांच्या मनात आपल्या लोकपयोगी कामांनी जागा निर्माण करणाच्या राजकारणाची सुरुवात सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यामधून सुरू केली आणि लिम्का बुक ऑफ रेकार्ड पर्यत हा प्रवास पोहचला आहे. सहा वेळा त्यांना जनतेने आमदार म्हणून निवडून दिले आहे . विकासाच्या दृष्टिकोनाच्या बळावर ज्या मतदार संघात स्वतःच्या जातीचे फारसे लोक नाहीत. ज्या मतदार संघात पक्षाच्या विचारधारेला बांधील असणारी पिढी नाही. ज्या मतदारसंघात जात, पात, धर्म, पंथ, पैसा, बाहुबल साऱ्याच अघटीतावर राजकीय साठमारी होऊ शकण्याची दाट शक्यता आहे. अशा ठिकाणी कायम सुधीर मुनगंटीवार उभे राहिले. आणि जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले. पैशाशिवाय सत्ता सत्तेशिवाय पैसा नाही किंवा राजकारणात येण्यासाठी घराणेशाही पाठबळ राजकीय वरदहस्त लागते या पूर्वापार सर्व समजुतींना बाजूला सारत समाजाच्या सात्विकपणाला, सामाजिक पुरूषार्थाला हात घालून, जागृत करून त्यांनी आपला विजय संपादन केला आहे. विजय झाला तर माजू नये आणि पराभव झाला तर लाजू नये ही साधी त्यांची राजकीय जया पराजयाची परिभाषा आहे.

भारतीय राजकारणात प्रत्येक मतदार संघामध्ये अशा प्रकारचे नेतृत्व उभारणे आणि ते जोपासणे देशाच्या हितासाठी आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये यथा राजा तथा प्रजा म्हटल्या जाते हे परस्पर पूरक असते. एखाद्या मतदार संघाचे नेतृत्व भ्रष्ट, आशिक्षित आणि अनैतिक मार्गातून तयार झाले असेल तर त्या नेतृत्वाची छाप मतदार संघावर पडते. अनेक पिढ्यांना नेतृत्वाची चुकीची प्रेरणा मिळते… आणि हळूहळू सत्तेत आलेल्या चुकीच्या नेतृत्वाचे गुण समाजाच्या धमन्यांमधून वाहायला लागते. पुढचे नेतृत्व देखील त्याच धाटणीचे तयार होते. मतदार संघाच्या अनेक वर्षांचा मानसिक मशागतीतून एक पिढी निर्माण होत असते. भाऊना वाढदिवसाला शुभेच्छा देताना आपण घडवलेल्या संवेदनशील, विकसनशील, पिढीच्या हातात हा जिल्हा उभा राहातो हे समाधानही आपल्याला निश्चितच ऊर्जा देण्याचे काम करेल, हे सांगणे औचित्यपूर्ण ठरेल.


सध्याच्या राजकीय उलटफेरमध्ये सत्तेपासून दूर राहण्याचे अघटीत सुधीर भाऊंच्या आयुष्यात घडले. एखादा खळखळता प्रवाह बांध टाकून संथ करण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील विकासकामांचा झाला आहे. एक पाच वर्ष अर्थमंत्रीपद लाभल्यानंतर विकासाचा बारामती पॅटर्न स्वतःच्या मतदारसंघात, आपल्या हयातीत राबविण्याचे भाग्य त्यांना मिळाले आहे. हा विकासकामांचा धबधबा सुरु असताना अचानक सत्तेपासून दूर राहावे लागल्यामुळे आता चंद्रपूरची जनता निवडणुकांनंतर भानावर आली आहे.

निवडणुकीच्या काळात जातीपातीचा, अर्थकारणाचा कैफ उतरल्यानंतर जेव्हा जाग आली तेव्हा प्रचंड पोकळी निर्माण झाल्याचे आता लक्षात यायला लागले आहे. ही पोकळी न भरणारी आहे. हा योगायोग पुन्हा मतदारसंघाच्या नशिबात येणार की नाही? अशी चर्चा हळूहळू सुरू झाली असून विचारवंत,ओपिनियन मेकर, यांच्यापासून आता सामान्य नागरिकांमध्ये देखील या चर्चेला उधाण आले आहे. एक प्रचंड मोठा फरक, एक प्रचंड मोठी पोकळी आणि एक प्रचंड मोठे अंतर अवघ्या सहा महिन्यांमध्येच विकासकामांमध्ये निर्माण झाले आहे.

कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये जिल्ह्याच्या विविध भागात सुधीरभाऊंच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या अनेक वास्तूंनी या काळात सामान्य नागरिकांना अलगीकरण, विलगीकरण अर्थात कॉरेन्टाईन करण्याच्या सुविधा मिळण्यात मदत झाली आहे. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांना आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक महत्त्व देणारे सुधीरभाऊ सध्या कोरोना काळातील बाधितापासून तर त्यांच्या नातेवाईकांना देखील देवदूत वाटताहेत.

सैनिकी शाळा, वन अकादमी, विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारती, वसतीगृहे, पोलीस ठाणी, वसाहती, कोरोना काळामध्ये उत्तम वैद्यकीय सुविधा पुरविणारी केंद्र झाली आहे. ही दूरदृष्टी त्यांना सगळ्यांपेक्षा वेगळे ठरवते.

पुढच्या शंभर वर्षात आठवण राहिल अशा काही वास्तू त्यांच्या पाच वर्षांच्या काळात निर्माण झाल्या आहेत. यामध्ये सैनिकी शाळा ,वन अकादमी ,बोटॅनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नियोजन भवन, कोषागार भवन, अभ्यासिका, वसतिगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, वनविभागाची देखणी विश्रामगृहे, इको पार्क, उभे राहत असलेले मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल ,दाताळा फुल, प्राथमिक आरोग्य केंद्र,पोलिस ठाण्यांच्या इमारती, अशा कितीतरी पायाभूत सुविधांनी चंद्रपूरच्या वैभवात भर टाकली आहे.

कोरोना संकटाच्या काळामध्ये ही सगळी पायाभूत सुविधा सध्या कामी येत आहेत. खरे म्हणजे सुधीर भाऊंनी केवळ मतदारसंघातच काम केले असे आरोपही होत असतात. या आरोपाला ही समजून घेतले पाहिजे. जिल्हा मुख्यालय आणि लगतच्या परिसरात असणाऱ्या त्यांचा मतदारसंघ याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. हे सत्य आहे. पण सुधीर भाऊंना गडचिरोली पासून पार तळकोकणातील अनेक जिल्ह्यांमधून आजही दूरध्वनी सुरू राहतात. अर्थमंत्री म्हणून त्यांनी या काळात कोणताही पक्षाभिनिवेष न पाळता विविध पक्ष संघटना व आवश्यकतेनुसार काम केले आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जनता त्यांचे कायम आभार व्यक्त करीत असते पंढरपूर पासून तर कोकणातील गावाकसब्यातील जनता यासाठी त्यांना फोन करून आपल्या गावात निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांसाठी त्यांचे आभार मानते ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते ते महाराष्ट्राचे वनमंत्री होते त्यामुळे या काळात त्यांनी महाराष्ट्रभर विकास कामे केली आहेत आम्ही केवळ जिल्ह्यापुरता आणि त्यातही त्यांच्या मतदार संघ पुरताच मर्यादित विचार करून आपलं नेतृत्व मर्यादित करीत असतो. गेल्या पाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्राचे विकास विकास पुरुष म्हणून त्यांचे नावलौकिक वाढले आहे.

केवळ पाच वर्षाच्या संधीमध्ये त्यांनी हे केले आहे हे देखील लक्षात घ्यावे. त्यांना आणखी संधी मिळाली असती तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या साऱ्याच जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावण्याची क्षमता, तेवढा मनाचा मोठेपणा, आणि विशाल दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे.

त्यांचे सत्तेत नसणे, सत्य जे सध्या आहेत त्या नेतृत्वात दृष्टिकोनाचा अभाव असणे, ही नेतृत्वाची पोकळी विदर्भात, महाराष्ट्रात कायम राहिली आहे. तुम्ही निवडून येता, तुम्हाला पदेही मिळतात. मात्र गरुडाचे पंख भेटून उपयोग नसतो त्यासाठी महत्त्वाकांक्षेचे आत्मबळ देखील डोक्यात असावे लागते. अनेक राजकीय नेते वर्षानुवर्षे निवडून येतात. मात्र त्यांच्या दीर्घ राजकीय कालावधीतून मतदार संघाला, जिल्ह्याला काय मिळाले याची मोजदाद हाताच्या बोटांवर देखील होत नाही. दृष्टिकोन नसणारे आणि राजकीय संधीसाधू असणारे नेतृत्व तुमचा विकास करू शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. लोकशाही व्यवस्थेमध्ये नेतृत्वाच्या दृष्टिकोनाला सर्वात महत्त्व आहे. या दृष्टिकोनावरच नौकरशाही पुढे काम घेऊन जात असते. चंद्रपूरमध्ये राहून दिल्ली-मुंबई हलविणाऱ्या, आपल्या अभिनव प्रयोगाने हजारोंच्या आयुष्यात कायापालट करणाऱ्या आणि रोजगाराच्या, नोकरीच्या अनेक संधी निर्माण करणाऱ्या पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर नेणाऱ्या नेतृत्वाच्या गतीला सत्तेचा अडथळा बसला आहे.

मात्र सुधीर भाऊ हे न थांबणारे रसायन आहे. जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हाही लोकांसाठीची धडपड आणि कामे सुरू होतीच. ही कामे अशीच पुढे सुरू राहावी, त्यांना उत्तम आयुष्य लाभावे, या जिल्ह्याला या विदर्भाला या प्रदेशाला आणि या देशाला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. तुमच्या दृष्टीकोनाला आकाश देखील ठेंगणे आहे. त्यामुळे नव्या गगनभरारीसाठी या वाढदिवसाला आमच्या कोटी कोटी शुभेच्छा

श्रीकांत मलोझलवार
भाजपा, सोशल मीडिया सल्लागार महाराष्ट्र.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने