Click Here...👇👇👇

जिवती तालुक्यातील सहा गावातील पी एस सी तात्काळ सुरू करा- प्रहारचे सुरज ठाकरे यांची मागणी.

Bhairav Diwase
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने योग्य ती पावले न उचलल्यास प्रहार जनशक्ती पक्ष , जिल्हा चंद्रपूरच्या वतीने प्रहार स्टाईल ने आंदोलनाचा इशारा.
Bhairav Diwase. Aug 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
जिवती:- जिवती तालुका येथील ६ गावामधील पी एस सी गेल्या अनेक वर्ष्यापासून बंद असल्याने , समस्त गावकऱ्यांच्या होणाऱ्या त्रासाला आळा घालण्याकरिता तेथील पी एस सी तात्काळ चालू करण्याबाबतचे निवेदन मा . मुख्य कार्यकारी अधिकारी , साहेब जिल्हा परिषद चंद्रपुर , ( महाराष्ट्र राज्य ) यांना प्रहारचे सुरजभाऊ ठाकरे यांनी दिले. जिवती तालुक्यातील १ )भारी २ )टेकामांडवा ३ )खडकी हिरापुर ४ )नंदपा ५ )कुभेझरी ६ )केकेझरी या ६ गावातील पी एस सी गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत . यामुळे तेथील समस्त गावकऱ्यांना उपचारासाठी जिवती अथवा राजुरा यावे लागत आहे . यामुळे त्या गावकऱ्यांचे हाल होत असून या सर्व गोष्टींकडे गावकऱ्यांनी शासनाचे वारंवार लक्ष वेधून दिले असता देखील जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे , अशी अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे . नमूद गावांमधील पी एस सी चालू करण्या करता जिल्हा परिषद आरोग्य विभागाने योग्य ती पावले न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष , जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून देण्यात आला आहे.