गडचांदुरचा राजा गणेश मंडळाचे आयोजन.
Bhairav Diwase. Aug 26, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदुरचा राजा गणेश मंडळातर्फे योद्धा डॉक्टर सुनील टेकाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याआधी डॉक्टर टेकाम यांनी गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात कार्य केले. तसेच डॉ. टेकाम सध्या वरोरा येथील रुग्णालयात कार्यरत होते. कोरोना रुग्णांची सेवा करताना त्यांना कोरोना साथीने ग्रासले. चंद्रपुरात कोव्हीड केअर सेंटरला उपचार घेत असताना त्यांचे दुःखद निधन झाले. सध्या करूना विश्व संकटाच्या काळात गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केल्या जात आहे. या परिस्थितीत परिवर्तन बाप्पा हा विधायक सामाजिक उपक्रम गडचांदुर चा राजा गणेश मंडळातर्फे राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक गरजूंना प्रत्यक्ष मदत दिली जात आहे. तसेच विघ्नहर्ता म्हणून ओळख असलेल्या बाप्पाने कोणाचे हे विघ्न दूर करावे अशी प्रार्थना भक्तगण करताना दिसतात.
या अनुषंगाने गडचांदूर येथील सुप्रसिद्ध गडचांदुरचा राजा गणेश मंडळाने कोरोना योद्धा डॉ. सुनील टेकाम यांना श्रद्धांजली अर्पित केली. त्याचप्रमाणे कोरोना संकटात अनेक डॉक्टर्स पोलीस आरोग्य कर्मचारी आदींना जीव गमवावा लागला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना बाप्पा चरणी गणेश भक्तांनी केली यावेळी गडचांदुरचा राजा गणेश मंडळाचे सचिन सातभाई, अभिलाश तुराणकर, शुभम कातकडे, देवेंद्र मुन, महेश झाडे, चेतन सौताने, मंगेश कवलकर, सारंग मेंढी, सुनील बुटले, सचिन जनाले, महादेव हेपट आदी सदस्य उपस्थित होते.