सोयाबीन पिकांवर लष्करी अडी तर धान पिकावर मोठ्या प्रमाणात कडप्या रोगाचा प्रादुर्भाव.

Bhairav Diwase
चिमूर तालुक्यातील शेतकरी संकटात.
Bhairav Diwase. Aug 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- कोरोनाच्या महामारीच्या काळात देशाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी यांनी अनेक संकटांना मात देत आपल्या शेतात सोयाबीन ,कापूस व धान पीक वाढविले चिमूर तालुक्यात पाऊस उशीरा पर्यंत आला परंतु शेतकऱ्यांनी हिम्मत न सोडता उशिरापर्यंत का होईना परंतु धान रोवणी पूर्ण केली.सध्या सोयाबीन पीक हे सेंग अवस्थेत असून आता काही दिवसांत हे पीक पूर्ण पणे तयार होणार होते परंतु या पिकांवर लष्करी अडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने अडी सोयाबीन पिकाच्या सेंगेला पोकडत असल्याने सेंगा जमीनीवर तुटून खाली पडत आहेत.या वर्षी तुरडक पाऊस असल्याने सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात जोमाने वाढ झाली आहे त्यामुळे फवारणी करणे शक्य नाही त्यामुळे हाती येणारे सोयाबिन पीक शेतकऱ्यांच्या हातुन गेले आहे.

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धानाला मोठ्या प्रमाणात कडपा रोग लागला असून धान पीक संकटात सापडले आहे पीक वाचविण्यासाठी शेतकरी फवारणीसाठी औषधी खरेदी करत आहेत परंतु कृषी केंद्र चालकांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट होतांना दिसत आहे.शेतकऱ्यांच्या जनावरांवर लम्पि रोग आल्याचे शेतकरी सर्व बाजूने आर्थीक संकटात सापडला असून शासनाकडून मदत मिळण्याची शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.