रोट्रॅक्ट क्लब ऑफ स्मार्ट सिटी चंद्रपूर कार्यकारणी घोषित. #chandrapur

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- रोट्रॅक्ट क्लब ऑफ स्मार्टसिटी चंद्रपूर टाऊन ची 2020-2021 या सत्रासाठीच्या कार्यकारी मंडळाची घोषणा आज करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ स्मार्टसिटी चंद्रपूर च्या पूर्व अध्यक्षा रोटरीयन डॉ. विद्या बांगडे व डॉ. प्रमोद बांगडे उपस्थित होते. त्यांनी संघटनात्मक कामा बद्दल माहिती दिली व क्लब चे काम कसा वाढणार या बद्दल सुद्धा सुचना केल्या त्यामध्ये आणि त्यांनतर कार्यकारी मंडळाची घोषणा केली त्या मध्ये अध्यक्ष म्हणुन श्री. यश बांगडे,सचिव श्री. मुर्तजा बोहरा, उपाध्यक्ष श्री. स्नेहीत लांजेवार, कोषाध्यक्ष श्री.प्रतीक हरणे, संचालक मंडळात पाच जणांची निवड करण्यात आली त्यामध्ये श्री.कुणाल गुंडावार, कु.रुचिता गर्गेलवार, कु.मोनिका चौधरी, श्री.रोहित भोयर, कु.पायल गोंनाडे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुणाल गुंडावार यांनी केलं व आभार प्रदर्शन यश बांगडे यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांनी रोटरी परिवाराचे बॅचेस देऊन नवीन पदाधिकाऱ्यांचे रोटरी परिवार मध्ये स्वागत केले.