शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे केले आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता मडावी यानी केल.
Bhairav Diwase. Aug 25, 2020
जिवती:- जिवती वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गावालगतच्या जंगलात वाघ दिसल्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. 23 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास गावातील काही शेतकरी आपल्या शेतात फिरत असताना शेतात व लगतच्या जंगलात वाघाचे ठसे व रानडुकरालाही फस्त केल्याचे दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याची माहिती जिवती वनविभागाला दिली असता वनपरिक्षेञ अधिकारी योगिता मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची चमू शेतात दाखल झाली. व त्याच्या ठस्याचे निरिक्षिण करून ठस्याच्या दिशेने जंगलात गेले असता वाघाने एका रानडुकरालाही फस्त केल्याचे आढळून आले आहे.हा वाघ शेतातुन जंगलाच्या दिशेने गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.या गावालगत वन लागून आहे. मात्र या आधी कधी वाघाचे दर्शन झाले नव्हते मात्र आता या भागात वाघाचे वास्तव्य असल्याचे कळताच वन विभागाने आपली गस्त वाढविली आहे.