तिलक ने सुरु केली मोफत शाळा.
Bhairav Diwase. Aug 25, 2020
कोरपना:- गडचांदुर कोरोना महामारीच्या काळात शाळा महाविद्यालय अंगवाडी हे सुद्धा बंद आहे काही ठिकाणी ऑनलाइन शिक्षण पद्धती सुद्धा सुरु आहे पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मोठा प्रश्न पडला ऑनलाइन शिक्षण घेणं त्यांच्या नशिबात नाही अश्यातच गावातील सुसुक्षित तरुण तिलक पाटील याला लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न खटकू लागला व त्याने गावातच ज्ञानशाळा सुरू केली.
लॉकडाऊन असल्यामुळे गावातील शाळा काही तास सुरू राहते पण त्या नंतर गावातील विद्यार्थी सैरावैरा जिकडे तिकडे तिलक भटकताना दिसत होते उन्हातान्हात खेळताना दिसत होते उगाच ते वेळ वाया घालवत आहेत .. असे त्याला नेहमी वाटत राहायचे कारण कोरोनामुळे किती शिक्षणाची नुकसान होत आहे
हे तिलक ला चांगलच ठाऊक आहे कारण तो सुध्धा एक पदविचाच विद्यार्थी आहे
विद्यार्थी शिक्षण घायच्या लहानशा वयात त्यांच्या मधे कोरोना सारख्या रोगाने पाय रोवणे सुरु केले या काळात विद्यार्थ्यांच्या डोक्यात शिक्षणाबद्दल काहीच जात नव्हत तिलक ने विचार केला गावातील सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांना शिकवायच हे ठाम निश्चय केला
अंगणवाडी ते सातव्या वर्गापर्यंत विद्यार्थी आज तिलक कडे येत आहेत
तिलक पाटील त्यांना Basic knowledge , Maths, General knowledge, English या सर्व विषयावरील दररोज वर्ग घेऊन त्यांना माहिती देत असतो विद्यार्थ्यांन कडून लिखाण वाचन करावून घेत असतो शेवटी तीन तासानंतर घरी जाता वेळी प्रार्थना घेतो
तिलक ला असाच पाठिंबा आतापर्यंत देत आलेल्या त्याच्या मित्र परिवाराचा गावकऱ्यांचे सहकार्य मिळाले व समोर सुद्धा असेच सहकार्य मिळावे अशी तिलक ची इच्छा आहे
तसेच सर्व गाव सदस्य या उपक्रमाला खंबीरपणे सहकार्य करतीलच पाठिंबा देत आहे याने तिलक ची हिंमत आणखी वाढली
विशेष खेड्यातले पोरं ये येडे असतात ही संकल्पना डोक्यातून काढून टाका कारण गावातून बाहेर गेलेले खेड्या पाड्यातील प्रत्येक विद्यार्थी हा चंद्रपूर जिल्ह्यावर राज करतो आहे अख्या महाराष्ट्रात डंका वाजवतो आहे हे विसरता कामा नये...... असे तिलक पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले