पुरोगामी पत्रकार संघ शाखा पोंभूर्णाची कार्यकारिणी गठित.
Bhairav Diwase. Aug 24, 2020
पोंभुर्णा:- पुरोगामी पत्रकार संघ शाखा पोंभूर्णाचे संघटक पदी भैरव दिवसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश कोमावार यांनी जिल्हा अध्यक्ष रुपेश निमसरकार यांचे सूचनेनुसार व त्यांचे उपस्थितीत कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. जवाहर धोडरे, सचिव म्हणून अविनाश वाळके, उपाध्यक्ष म्हणून विजय वासेकर, सहसचिव म्हणून निशाल मेश्राम, कोषाध्यक्ष म्हणून विजय ढोंगे व तालुका संपर्क प्रमुख म्हणून निलकंठ नैताम यांची निवड करण्यात आली. सदस्यात सुरज गोरंतवार, दिलीप मॅकलवार,स्वप्नील मंडोगडे ,अतुल भडके यांचा समावेश आहे. नवनियुक्त कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, अध्यक्ष सुरेश कोमावार यांनी अभिनंदन केले आहे.