घनोटी तुकूम येथील घटना.
Bhairav Diwase. Aug 24, 2020
पोंभुर्णा:- पोंभूर्णा येथून जवळच असलेल्या घनोटी तुकूम येथील अडीच वर्षीय बालकाचा करुण मृत्यू झाला. मृतक बालकाचे नाव मोहक यशवंत ढोंगे असे आहे.
आपल्या अंगणात खेळत असताना तोल जावून पडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २४ ला सायंकाळी घडली. कुटुंबियांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहक हा आपल्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता.