प्रहार संघटनेचा उपक्रम.
Bhairav Diwase. Aug 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली येथील विश्वशांती विद्यालयाच्या वर्ग 10 च्या विद्यार्थिनी तालुक्यात बाजी मारली. तालुक्यातून 94.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या कुमारी गुणगुण संजय कोतकोंडावार व 92.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावलेला गुण अजय तुम्मे यांचा सत्कार प्रहार संघटना सावलीच्या वतीने नुकताच करण्यात आला.
मानवाच्या अंगी जिद्द व चिकाटी असेल तरच त्या समोर अशक्य असे काहीच नसते. याची प्रचिती घेऊन तालुक्यात विद्यार्थिनी दाखवत समाजापुढे आदर्श ठेवला की, आम्ही मुलांपेक्षा कमी नाही. याचा अभिमानच आहे. याची दखल घेत सावलीच्या प्रहार संघटनेने यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यावेळी प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार, प्रफुल तुम्मे, विद्यालयाचे शिक्षक प्यारमवार सर, गुणवंत विद्यार्थिनीचे पालक वर्ग उपस्थित होते.