Bhairav Diwase. Aug 25, 2020
गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथुन पंधरा कि.मी. अंतरावर असलेल्या हीवरा गावातील शेतकरी जंगली डुकरांच्या हैदोस्यांमुळे त्रस्त झाले आहे.गावातील बहुतांश शेतकर्यांच्या धान ,पराटी,सोयाबीन ईत्यादी उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत .सध्या शेतकर्यांच्या शेतातील पिके जोमात असुन रात्री अपरात्री जंगली डुकरे येऊन हैदोस घालतात त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन जाण्याची वर्तवली जात आहे.अतोनात खर्च करुन कष्टाने जगवलेली पिके वण्य प्राण्यां कडुन फस्त केली जात असल्याने चौफेर चक्रव्युहात सापडलेल्या शेतकर्यांना जगावे कि मरावे असा प्रश्न पड्ला आहे. कारण ही तसेच आहे,बँकांनी शतकर्यांच्या खात्यावर कर्जाच्या व्याज रकमेची थकबाकी दाखविल्याने नवे कर्ज मिळतांना त्याच्या नाकी नऊ येत आहे,शेतकरी विम्याचा लाभ होत नाही,कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ,शेतमालाचा अपुरा दर ,बँकांकडुन होणार्या कृषी पतपुरवठ्यातील अडचणी अशा विविध संकटांचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहे. तेव्हा या प्रकरणाकडे संबंधीत अधिकार्यांनी लक्ष देऊन वण्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अण्यथा मारण्याची परवाणगी तरी द्यावा अशी रविंद्र कुत्तरमारे, राजु ठाकुर, संदिप कुत्तरमारे, प्रदिप फरकडे, चरणदास विरुडकर, प्रदिप चहारे, इत्यादी स्थानिक शेतकर्यांची मागणि आहे.