जाणून घ्या सविस्तर....
भारत:- इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल (Indian Premier League - IPL) आजपासून सुरू होत आहे. यंदाची आयपीएल २०२० (IPL 2020) ही स्पर्धा लाइव्ह बघण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. टीव्ही, मोबाइल, टॅब, लॅपटॉप आणि पीसी अर्थात पर्सनल कम्प्युटर एवढ्या ठिकाणी यंदाची आयपीएल लाइव्ह बघता येईल. आज शनिवार, १९ सप्टेंबर २०२०, आयपीएलचा पहिला दिवस. स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) या स्पर्धेतील सर्वाधिक सक्षम संघांच्या मुकाबल्याने होत आहे. ही मॅच अबुधाबीत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता मॅच सुरू होणार आहे. (IPL 2020 Mumbai Indians vs Chennai Super Kings Where to get live streaming in India)
याआधी २०१९ मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) यांच्यात अंतिम सामना झाला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने २० षटकांत आठ बाद १४९ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपरकिंग्स संघाने २० षटकांत सात बाद १४८ धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्स संघाचा एका धावेने विजय झाला. या विजयामुळे २०१९च्या आयपीएलचा विजेता होण्याचा मान मुंबई इंडियन्स संघाने आणि उपविजेता होण्याचा मान चेन्नई सुपरकिंग्स संघाने मिळवला. यंदा पहिल्या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स एकमेकांसमोर आहेत. यावेळी चेन्नई मागच्या वेळच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेणार की मुंबई पुन्हा जिंकणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
दुबई, शारजा आणि अबुधाबीत होणार सामने:-
संयुक्त अरब आमिराती (United Arab Emirates - UAE) येथे आयपीएलचे सामने दुबई, शारजा आणि अबुधाबी येथील स्टेडियमवर खेळवले जातील. याआधी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील २० सामन्यांचे आयोजन युएईमध्ये झाले होते. यावेळी कोरोना संकटामुळे स्पर्धेतील सर्व सामने भारताऐवजी संयुक्त अरब आमिराती येथे होणार आहेत.
आयपीएलसाठी कोविड प्रोटोकॉल:-
स्पर्धेसाठी कोविड प्रोटोकॉलचे (covid protocol) पालन सुरू आहे. स्पर्धेदरम्यान दर पाचव्या दिवशी टीमच्या सर्व सदस्यांचे परीक्षण केले जाईल. स्पर्धेच्या निमित्ताने दररोज सर्व जणांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी होईल. एखाद्या व्यक्तीची तब्येत बरी नसल्यास त्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत दिली जाईल. कोरोना झाल्याचे लक्षात आले तर उपचार करुन घ्यावे लागतील. संबंधित व्यक्तीला तब्येत बरी होईपर्यंत (कोरोनामुक्त होईपर्यंत) क्वारंटाइन राहून उपचार घेण्याचे बंधन असेल. कोविड प्रोटोकॉल सर्वांना लागू आहे. प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे.
आयपीएलची मॅच कुठे आणि कशी बघायची याविषयी....
आयपीएल २०२० ,तेरावी आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा
कोरोना संकटामुळे भारताऐवजी संयुक्त अरब आमिराती येथे आयोजन
पहिला सामना - मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स
थेट प्रक्षेपण - भारतीय वेळ - संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण - संयुक्त अरब आमिरातीमधील वेळ - संध्याकाळी ६ वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण - टीव्ही चॅनल - स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स २ एचडी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी
थेट प्रक्षेपण - अॅप - डिस्ने+हॉटस्टार (हॉटस्टार) Disney+Hotstar (Hotstar) आणि यपटीव्ही YUPP TV