बल्‍लारपुर तालुक्‍यातील कोलगाव ते विसापुर मार्गावर वर्धा नदीवर मोठया पुलाच्‍या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधी योजनेतुन 56 कोटी रु. निधी मंजुर.

Bhairav Diwase

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलित.

आ. मुनगंटीवार यांनी मानले ना. नितीन गडकरी यांचे आभार.
 Bhairav Diwase.    Sep 19, 202



(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर
चंद्रपूर:-
राज्‍याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयातील बल्‍लारपुर तालुक्‍यातील कोलगाव ते विसापुर या प्रमुख जिल्‍हा मार्गावर वर्धा नदीवर मोठया बुडीत पुलाचे बांधकाम केंद्रीय मार्ग निधी  योजनेअंतर्गत मंजुर झाले असुन यासाठी 56 कोटी 56 लक्ष रु. निधीला प्रशासकीय मान्‍यता देण्‍यात आली आहे.

चंद्रपूर जिल्‍हयातील बल्‍लारपुर तालुक्‍यातील कोलगाव ते विसापुर या प्रमुख जिल्‍हा मार्ग 113 वर वर्धा नदीवर मोठया बुडीत पुलाचे बांधकाम केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत मंजुर व्‍हावे यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भूपृष्‍ठ परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्‍याकडे पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. या पाठपुराव्‍याच्‍या फलस्‍वरुप सदर पुलाचे बांधकाम केंद्रीय मार्ग निधी योजनेतुन सन 2019-20 यावर्षात मंजुर करण्‍यात आले आहे. या पुलाच्‍या बांधकामासाठी 56 कोटी 56 लक्ष रु. निधी मंजुर झाला आहे.
हा मोठा पुल कोलगाव नांदगांव, सास्‍ती व विसापुर हया प्रमुख गावांना जोडत असुन यामुळे सास्‍ती मार्गे जाणा-या वाहतुकीस दिलासा मिळून हे अंतर 10 किमी ने कमी होणार आहे. या पुलामुळे कोलगांव, सास्‍ती, नांदगांव व विसापुर येथील अंदाजे 24 हजार नागरिकांना फायदा होणार आहे. या मोठया पुलाची लांबी 360 मीटर असून पुलाच्‍या दोन्‍ही बाजुचे पोचमार्ग 3.50 किमी लांबीच्‍या सिमेंट कॉंक्रीट रस्‍त्‍याद्वारे जोडण्‍यात येणार आहे. सदर पुलाच्या  बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुलाचे बांधकाम दोन महिन्यात सुरु होईल. तसेच दोन वर्षाच्या  कालावधीत पुलाचे बांधकाम पुर्ण करण्‍याचे नियोजित आहे.

सदर पुलाच्‍या बांधकामासाठी केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत 56 कोटी रु. निधी मंजुर केल्‍याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ना. नितीन गडकरी यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे.