पबजी च्या नावाने टुर्नामेंट भरवून शाळकरी युवक-युवतींची लाखोंनी लुट!

Bhairav Diwase
धक्कादायक प्रकार; गडचांदुर मधून मिळाले काही सुत्र!

गडचांदूर मध्ये ही युवकांचे रॅकेट सक्रीय असल्याची चर्चा?

गडचांदूरातील तरूणाने लाखो रूपये हरल्याची चर्चा!

पब्जी चा कोरियन व्हर्जन वापरून लुट!

स्थानिक आर्थिक शाखेकडून सखोल चौकशी करण्याची पोलिस अधिक्षकांकडून अपेक्षा!
Bhairav Diwase. Sep 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- पब्जी गेमिंग (pubg gaming) चे नावावर तरूण युवक-युवतींची ऑनलाईन लुटमार करणारे रॅकेट गडचांदूर मध्ये सक्रिय असल्याचे वृत्त हाती आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या नेटवर्क शी हे रॅकेट जुळले असल्याचे आजचे चित्र आहे. या रॅकेट च्या माध्यमातून तरूण शाळकरी युवक-युवतींची गोवून त्या माध्यमातून आर्थिक लुबाडणूक चा हा प्रकार असल्याचे अनेकांचे मत आहे. या प्रकाराची सखोल चौकशी झाल्यास यातील मोठे धागेदोरे बाहेर येऊ शकतात. नव्यानेच रुजू झालेले पोलिस अधिक्षकांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी आता होवू लागली आहे. या रॅकेट चे जाळे चंद्रपूर जिल्ह्यात सहित नागपूरमध्ये व संपूर्ण विदर्भातील मोठ्या शहरांमध्ये पसरले असल्याचे सांगण्यात येत आहे.




हाती आलेल्या वृत्तानुसार, पबजी ऑनलाईन गेमींगच्या नावाने हा गेम भरविल्या जातो. सुरूवातीला अत्यंत अल्प फी आकारून शहरातील व शहराच्या बाहेरील परिचित शाळकरी युवक-युवतींना व्हॉटस् अँप ग्रुप बनवून त्यामध्ये अॅड केले जात असल्याचे कळते, ही फी भरण्यासाठी गुगल पे, फोन पे सारख्या अॅप चा वापर करण्यास सांगीतले जाते. गेम खेळणाऱ्यांना मोठ्या बक्षिसाची आमिष दिल्या जात असल्याचे ही निदर्शनास आले आहे. त्यानंतर युवक-युवतींनी आकारलेली अत्यल्प फि भरल्यानंतर व्हॉटस् अॅप ग्रुप वर एका विशीष्ट वेळेवर जोड्या बनवून हा गेम खेळल्या जातो. या गेम मध्ये विजेत्याला ठरविलेले बक्षिसे देवून ही चेन वाढविल्या जाते व पुन्हा मोठ्या बक्षिसाची लालच देवून व ज्यादा ची फि आकारून त्यांना दुसऱ्या एखाद्या जिल्हास्तरीय
ऑनलाईन ग्रुप ला जोडून या शाळकरी युवक-युवतींना भटकविल्या जात असल्याचे चित्र आहे.

पहिल्यांदा २० - ५० रूपये प्रवेश फि आकारून ज्यादा बक्षिसाचे आमिष दाखवून नंतर हजारो रूपये फि आकारल्या जात असल्याचे वृत्त हाती आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी गडचांदूर शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुलाने अशाच ऑनलाईन गेमिंग मधून वडीलांच्या खात्यातील १५ ते १७ लाख रूपये गमविल्याची चर्चा होती.


हाती आलेल्या सुत्रानुसार, गडचांदूरात अंतर्यामी गेमिंग प्रेझेंट, Battleground tournament, Raw gaming, Thunder escorts, Gadchandur antaryami असे वेगवेगळ्या नावाचे ग्रुप या tournament भरविण्यासाठी सक्रीय आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोरोना चा उद्रेक भारतामध्ये वाढल्यानंतर भारत सरकारने चिनी अॅप असलेल्या पबजीवर बॅन आणला. हि सक्रिय असलेली टोळी आता कोरियन व्हर्जन वापरून हा रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र स्तरावर शाळकरी युवक-युवतींना लालच देवून लुबाडणुक करण्याचे हे षडयंत्र असल्याचे आता बोलल्या जात आहे. रतन खत्री यांच्या नावाने प्रसिद्ध असलेला सट्टा व्यवसाय आज ऑनलाइन झालेला आहे, हे सत्य पोलीस विभागाला पूर्णपणे ठाऊक आहे त्याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांना यामध्ये ओढून त्यांचेकडून आई-वडिलांची कमावलेली कमाई लुबाडणूक करण्याच्या तर हा प्रकार नाही याचा शोध घेणे फार गरजेचे आहे. कोरोना परिस्थीतीनंतर बहुतेक माता-पित्यांनी मुलांच्या अभ्यासासाठी त्यांना स्वतंत्र मोबाईल घेऊन दिला आहे. विद्यार्थी या मोबाईलच्या अशा पद्धतीने चुकीच्या वापर करत असेल तर त्यावर त्वरित अंकुश लागणे गरजेचे आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचे आर्थिक गुन्हे शाखेत कडून सखोल चौकशी केल्यास यातील सत्य बाहेर येऊ शकते या सोबतच गुगल पे, फोन पे वर असलेले खाते (अकाउंट) याचीही चौकशी करण्यात आल्यास महाराष्ट्र स्तरावरील मोठे घबाड चंद्रपूर पोलिसांच्या माध्यमातून उघडकीस येऊ शकेल, यात शंका नाही