घोसरी येथील माजी तंटामुक्ती अध्यक्ष अविशांत अलगमवार याला अटक.
लाखो रुपयांचा माल जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- चंद्रपुर जिल्ह्यात दारुबंदी असतांना जिल्ह्यात अवैध धंद्याने डोके वर काढले असून अवैध धंदे जोमात सुरु आहेत. यात मुल तालुका सुद्धा मागे नाही. तालुक्यातील अपवाद वगळता प्रत्येक गावात अवैद्य दारु विक्रीने प्रस्थ निर्माण करीत असतांना याला आळा घालण्यात मुल डिबी पथकाने कंबर कसली असून आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा घोसरी येथील नामे अविनाश उर्फ अविशांत मारोती अलगमवार वय 47 वर्षे याचे घरी प्रोव्ही रेड करून । पेटी ( 1000 नग ) देशी दारू अंदाजे किमंत 1,00,000 / -रु . चा माल आरोपीसह ताब्यात घेतला व महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये कारवाई केली.
पुढील तपास मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार सतिषसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.