सालो का काम हप्ते मे। और माहिनो का काम घंटो मे।

Bhairav Diwase
हलो प्रहार प्रहार संघटनेतून बिडकर बोलतोय विषय संपला.

वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्याचा प्रताप. एक वर्षांपासून अर्ज करून सुद्धा डिमांड बिल नाही पाठवले.

प्रहार कडे तक्रार दिल्या वर प्रहार चे सतिश बिडकर यांनी आठ दिवस मुदत दिल्यावर चारच तासात डिमांड काढले.
Bhairav Diwase. Sep 04, 2020

(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) सैय्यद नदीम अली, कोरपना
कोरपना:- प्रहार संघटना हि जनसामान्य, शेतकरी ,अपंग, कामगार यांच्या समस्या सोडवण्यास अग्रेसर आहे अशीच एक समस्या घेऊन एक शेतकरी तक्रार घेऊन प्रहार जनसम्पर्क कार्यालय गडचांदूर येथे आले मनोहर महादेव कुळसंगे  त्यांची तक्रार होती एक वर्षा पासून डिमांड बिल साठी अर्ज वीज वितरण कार्यालय पांढरकवाडा येथे  केला  एक वर्षा पासून त्यांना डिमांड बिल देण्यास  वीज वितरण कार्यलय टाळाटाळ करत आहे. दोन वर्षांपासून शेतात बोर मारून आहे पण वीज नसल्या मुळे कोणत्याही उपयोगात येत नाही असे त्यांचे म्हणणे होते त्या कारणाने त्याच्या शेताचे खूप नुकसान झाले त्यांनी सम्पूर्ण आपबीती प्रहार चे माजी तालुका प्रमुख सतिश बिडकर याना सांगितली त्याचवेळेस बिडकर यांनी वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्याला फोन करून  विचारणा केली असता आधी उडवाउडवीची उत्तरे दिली त्या अधिकाऱ्याची  चांगली कान उघाडणी  केली व आठ दिवसात डिमांड बिल न काढल्यास प्रहार स्टाईलने कार्यालयात येऊ अशी चेतावणी बिडकर यांनी दिली. आठ दिवसाचा कालावधी खूप दूर राहला त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता डिमांड बिल शेतकऱ्याच्या घरी पोहचले जे काम वर्षभर नाही झाले ते काम प्रहार ने काही तासात करून दिले असं मत त्या शेतकऱ्याने प्रहार  कार्यालयात येऊन म्हटले व प्रहार संघटनेचे आभार मानले   कुणालाही काही अडचण वा तक्रार  असल्यास प्रहार जनसम्पर्क कार्यलय चंद्रपुर वा प्रहार जनसम्पर्क कार्यालय गडचांदूर येथे तक्रार अर्ज लेखी स्वरूपात आणावे असे सतिश बिडकर यांनी म्हटले