प्रहार सेवक सुरज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सफाई कामगार संघटना स्थापन.
Bhairav Diwase. Sep 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदुर येथील सफाई कामगार अनेक समस्यामुळे त्रस्त होते त्यांनी अनेक राजकीय पक्षा कडून मदतीची अपेक्षा केली त्यांना शेवटी भोपळा च मिळाला ग्राम पंचायत १९९० पासून सफाई कामगर म्हणून काम करीत आहे त्यांचे नगर परिषद मध्ये समावेशन करणे आवश्यक होते पण नगर परिषद येथील इतर लिपिक कर्मचारी यांनी सफाई कामगार यांचे कोणाचेही नाव नगर परिषद समावेशन साठीचा प्रस्ताव पाठवला नाही उलट जे २०१४ ला ग्राम पंचायत कार्यकाळात कामावर लागले अश्या कर्मचाऱ्यांना नगर परिषद मध्ये समावेशन करण्यात आले जर अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांच्या समावेशन बाबत प्रस्ताव पाठवला असता तर आज त्यांचा मार्ग मोकळा असता व ते नगर परिषद मध्ये समाविष्ट झाले असते , सफाई कामगार यांचे वेतन चार ते पाच महिने कधीच होत नाही, कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून खुप ठिकाणी सत्कार झाला पण त्यांच्या घरी काही खायला आहे की नाही हे कोणी विचारले नाही फक्त फुल हार आणि प्रमाण पत्र याच्यातच त्यांना समाधान मानावे लागले पण कोणीही त्यांच्या समस्या सोडविण्यास तयार नाही हे जाणून त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या कडे समस्या मांडल्या। प्रहार चे संस्थापक माननीय मंत्री महोदय बच्चू भाऊ कडू कामगार मंत्री यांच्या कडे सर्व समस्या सादर केल्या असे बिडकर यांनी सांगितले अशातच त्यांनी
*प्रहार सफाई कामगार संघटना* स्थापन करण्याचे ठरविले प्रहार संघटना नेहमी कामगार व जनसामान्य माणसाच्या पाठीशी खम्बीर उभी असते . प्रहार चे माजी तालुका अध्यक्ष सतिश बिडकर प्रहार सेवक सुरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सफाई कामगार यांनी प्रहार सफाई कामगार संघटनेत प्रवेश करून*
*प्रहार सफाई कामगार संघटना स्थापन केली*
*सफाई कामगार यांचा लढा आता प्रहारचा लढा राहील व सफाई कामगारांना न्याय दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रहार सेवक सुरज ठाकरे यांनी सांगितले*
*तर सफाई कामगारांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी एक जुट राहने गरजेचे आहे तेव्हाच आपल्याला न्याय मिळेल आणि त्या साठी कोणतेही आंदोलन उभारायचे असल्यास आम्ही तयार आहो असे प्रतिपादन गौतम भासारकर यांनी केले*
या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाने सफाई कामगार यांच्यात ऊर्जा निर्माण होताना दिसली व सर्व कंगारांनी आम्ही आमच्या हक्काच्या लढाईत एकीने लढू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली