गोंडवाना विद्यापीठ प्रभारी कुलगुरूपदी:- डॉ. श्रीनिवास वरखेडी.

Bhairav Diwase
येत्या ८ सप्टेंबरला डॉ. वरखेडी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारणार.
Bhairav Diwase.    Sep 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉक्टर श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती झाली आहे. गोंडवाना विद्यापीठाला यासंदर्भात आज अधिकृत सूचना प्राप्त झाली.विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ.नामदेव कल्याणकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ६ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त होणाऱ्या पदावर डॉ.वरखेडी यांची नियुक्ती झाली आहे. येत्या ८ सप्टेंबरला डॉ.वरखेडी कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. सध्या डॉ.वरखेडी रामटेक येथील विद्यपीठामध्ये उपकुलगुरू आहेत.