चिचबोली येथील विविध पक्ष्याच्या कार्यकर्त्यांचा सेनेत प्रवेश.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- शिवसेना राजूराच्या वतीने तालुक्यात इनकमिंग चालूच असल्याच चित्र दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूभीवर तालुक्यातील चिचबोळी येथील विविध पक्ष्याच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि शिवसेना शाखेचे उदघाट्न करण्यात आले.
जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या आदेशाने माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात गावातील प्रकाशभाऊ ताजने यांना शाखा प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली तसेच शामसुंदर कारेकर, अमोल चोथले, विलास धानोरकर,संदिप साळवे सुधीर साळवे, यांसह कांग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी, सघटना, पक्षाला रामराम करत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.
याप्रसंगी, नगरसेवक राजुभाऊ डोहे,बाळुभाऊ कु़ईटे, निलेशभाऊ गम्पावार, राजु लोणारे सोनुर्ली विभाग प्रमुख, लख्खा बेरडी, प्रमोद आसुटकर, गनेश चोथले, रमेश झाडे ऊपतालुका प्रमुख, बंटी मालेकर ऊपतालुका प्रमु़ख, समीर शेख, गोपाल शिंदे आणि समस्त गावकरी उपस्थित होते,