महाराष्ट्र:- लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार गेले, त्यात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. अशातच लोकांनी वीज वापरली असून त्याचे बिल भरावे. कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हंटले आहे. यामुळे सर्वसामान्यांना झटका बसणार आहे.
नितीन राऊत म्हणाले कि, वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचेही वीज कनेक्शन कट होणार नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. तसेच योग्य बिल नसेल तर त्याची तक्रार करावी. मीटर पाहणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात बिल सवलत याबाबत केंद्र सरकारने मदत करावी. पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असे राऊत यांनी सांगितले.
वीज कंपनीने लॉकडाऊनमध्ये २४ तास वीजपुरवठा केला. महावितरणवर ६९ हजार कोटी कर्ज आहे. आम्ही कर्ज काढून कामकाज करत आहोत अजून किती करणार? असेही राऊत यांनी म्हंटले आहे.