आनंदगुडा येथ सृजन नागरिक मंच राजुरा यांच्या वतीने आदिवासी बांधवाना कपडे वाटप.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- आनंदगुडा ता. जिवती येथे सृजन नागरिक मंच राजुरा यांच्या वतीने गरजू गरीब आदिवासी बांधवाना कपडे वाटप करण्यात आले. याप्रसंगी, यात पॅन्ट, शर्ट,साड्या, लुगडी, ब्लँकेट, जॉकेट, धोती, टोप्या टॉयल, दस्त्या, सलवार, यासारख्या अनेक प्रकारचे कपडे वाटप करण्यात आले यावेळी गावातील गोविंदा बहु. युवा मंडळ व जय मल्हार युवा मंडळ आनंदगुडा याच्या सहकार्याने कपडे वाटप चा कार्यक्रम मोठया उत्सहात पार पडला. याप्रसंगी सृजन नागरिक मंच राजुरा येतील श्री.मिलिंद गड्डमवार, यांनी जलनिसर्ग संवर्धन, आणि कृषी पर्यटक, आणि पाणी फाउंडेशन याबद्दल माहिती देऊन लोकसहभागातुन जिवती तालुक्यात बरेच काम करता येतील याबद्दल लोकचळवळ उभी करण्याची आहे असे मत जलमित्र सामाजीक कार्यकर्ते श्री. गड्डमवार यांनी व्यक्त केले तसेच श्री.संतोष अक्केवार, यावेळी उपस्थित होते.तसेच युवा मंडळाचे स्वयंसेवक गोविंद गोरे, बालाजी मस्के, संतोष पोले,राजू सिडाम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. बापूराव गोरे,श्री. मोहन मस्के,दत्ताजी कवडे,गुंडा आत्राम,नायकू सिडाम,आदी गावातील नागरिक मोठया प्रमाणात यावेळी उपस्थित होते.