Top News

पोलीस कुटुंबियांकरिता चंद्रपुरात रांगोळी स्पर्धा संपन्न.

Bhairav Diwase. Nov 30, 2020
चंद्रपूर:- कोरोना महामारीच्या काळात आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या विषयावर पोलीस कुटुंबियांकरिता चंद्रपुरात रांगोळी स्पर्धा रंगली. सदर कार्यक्रमात पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी कोरोना महामारीमध्ये करोनायोद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कुटुंबियांना आरोग्यविषयक घ्यावयाच्या काळजीची सवय लावून पोलीस कुटुंबीय व सर्व जनतेमध्ये याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने सदर उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या विषयावर पोलीस कुटुंबियांकरिता पोलीस बहुउद्देशीय सभागृहात रांगोळी स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबातील महिला सदस्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. या रांगोळी स्पर्धेमध्ये स्पर्धकाकडून करोना महामारीच्या काळात आरोग्य विषयी घ्यावयाची काळजी बद्दल विविध घोषवाक्य, संदेश चित्रांचा समावेश असलेल्या आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या होत्या. सदर रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून येथील चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांनी काम बघितले. सदर स्पर्धेत एकूण ३२ पोलीस कुटुंबियांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कु. भाग्यश्री सदाशिव पेंदाम, द्वितीय क्रमांक प्रतिभा राजेग जंगम, तर तृतीय क्रमांक कुमारी निशा यशवंत कोसमशिले यांना देण्यात आला. शीतल सज्जन निरंजने, रश्मी विजय धोटे, प्रीती मुन्ना सोयाम,नेहा सुरेश मेश्राम व शितल मुर्लीधर नन्नावरे यांना प्रोत्साहनपर देण्यात आले. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला उपक्रमात सहभाग घेतल्याबद्धल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने