Top News

आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या.

Bhairav Diwase. Nov 30, 2020
चंद्रपूर:- आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या कार्यकारी अधिकारी डॉ . शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्रांने दिली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. 

हेही वाचा:- 'War and Peace' डॉ . शीतल यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवर केली होती हि पोस्ट. 

       डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे करजगी काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्याा. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे यांची मुलगी होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने