खेड्या गावातील विद्यार्थी डाँँ, महेंद्र नारायण वर्दलवार रा-मुधोली चक न ०१ ता. चामोर्शी जि. गडचिरोली यांनी अर्थशास्त्र या विषयात PHD पूर्ण झाल्यावर गावातील मित्र मंडळी व जेष्ठ नागरिक केल्यास कौतुकास आपल्या जीवनात घडलेल्या सर्व गोष्टीची जाणीव करून सर्वांचे अश्या प्रकार आभार मानले.
प्रिय सर्व, मित्र- Classmate, Seniors, आणि Juniors चे मनापासुन आभार.
तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे मण भाराऊन गेले आणि मला माझा सर्व शैक्षणिक आणि जिवनविषक प्रवास आठवला.
ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो जर कुणाला यातुन थोडीफार जरी प्रेरणा मिळालीतरी यातच माझे मोठे समाधन आहे. एवठाच हे लिहण्यामागचा माझा ऊद्देश.......
मुधोली चक नं. १ हे माझे गांव. आई- वडील अशिक्षीत आणि भाऊ शिक्षक. वर्ग १० वी पास होईपर्यंत मला शिक्षणात तशी काही आवड नव्हती. ११ वी, १२ वी ला इंदिरा गांधी वि. येनापुर (येथील प्राध्यापकांचे आभार) ला गेल्यानंतर त्यात थोडी आवड निर्माण झाली. नंतर D.ed ला नंबर न लागल्यामुळे. नापास होईपर्यंत शिक्षण घेत राहण्याचा निर्णय घेतला.
चंद्रपुरला एस. पी. महविद्यालयात बि.ए. करताना स्पर्धा परीक्षेचीही (यापुठे CE) तयारी करीत होतो. (२००७-१० दरम्याण) पण योग्य यश न मिळाल्यामुळे आणि त्याच वेळी मला अर्थशास्त्राचे भविष्यातील महत्व कळल्यामुळे मी एम. ए. करण्यासाठी नागपुरला गेलो घरचा सपोर्ट होता पण आर्थिक प्रश्न हा गंभीर होता (शिक्षणावरचा खर्च म्हणजे अनुत्पादक खर्च होय असा चुकीचा समज आहे).
अर्थशास्त्रात एम. ए. (नागपुर विद्यापीठ कॅम्पस) पुर्ण झाल्यानंतर आणि CE च्या माध्यमातुन कोणतीही (Class II& III ची) नौकरी न लागल्यामुळे आणि दुसरीकडे माझी अर्थशास्त्राची आवड तिव्रतेने वाढत गेल्याने. "पुणे हे विद्येचे माहेर घर आहे" असे अनेकदा ऐकलेले असल्यामुळे मी थेट नागपुर सोडुन पुणेला जाण्याचा निर्णय घेतला. आणि CE सोडुन अर्थशास्त्रात प्राध्यापक होण्याचे धेय्य निश्चिच केला (घरच्यांना मला नौकरी लागणार की नाही याची भिती गेल्या अनेक वर्षांपासुन आहे).
पुणेत आल्या आल्या एक ते दिड वर्षात मी दोनही NET आणि SET परिक्षी अर्थशास्त्रात ऊत्तीर्ण झालो. पण ४-५ ठिकाणी मुलाखाती देऊनही प्रा. म्हणुन निवळ न झाल्याने थोडी निराशा आली होती. पण काहीही साध्य न करता थांबने किंवा माघे फिरणे हे माझ्या बुद्धीला पटण्या सारखे नव्हते. म्हणुन पुढे अर्थशास्त्रात PhD. करण्याचा निर्णय घेतला आणि तेही एका जगप्रसिद्द अशा पुणेच्या Gokhale Institute of Politics and Economics या संस्थेत Government Schemes and Tribal Development या विषयाशी संबंधीत विषयावर PhD. करायला मिळाले. यासाठी मला दिल्लीवरुण ICSSR Fellowship मिळाली (Per month Rs. 17000).
यापुर्वी माझे M.A.पर्यंतचे सर्व शिक्षण मराठी माध्यमातुनच झाले (आणि माझ्यासोबतचे जवळपास सर्व English medium मधुन आणि तेही दिल्ली, मुंबई अशा Metro शहरातुन आणि विदेशातुन आलेले) होते. पण संपुर्ण PhD. Thesis English मध्ये लिहीणे आणि ते प्रत्येक सहा महिण्याला सर्वांसमोर Present करणे हे माझ्यासाठी मोठे कठीनच काम होते. पण मित्रांच्या सहवासाणे आणि PhD.गाईड च्या मार्गदर्शनाणे ते मला आच शक्य झाले. याच दरमॅन मला पुणेतील नामांकीत फरग्युसण महाविद्यालयात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणुन शिकविण्याची संधी मिळाली. मला पुर्णपणे माहीत नाही येणाऱ्या कालात किती यश आणि अपयश मिळते ते पण मी आज समाधाणी, आनंदी आहे आणि पुढेही असेच प्रयत्न चालु राहातील.
शेवटी मला एवढेच सांगायचे आहे की आपला जन्म फक्त नौकरी करण्यासाठी, कामच करण्यासाठी किंवा पैसाच कमावण्यासाठी नाही तर... हे जग समजून घेण्यासाठी, जगण्याचा आनंद घेण्यासाठी, एक चांगला माणुस म्हणुन विकसीत हाेण्यासाठी आहे. आपण केंव्हा संपु ते कुणालाच माहीती नाही. येणाऱ्या पिढीसाठी आदर्श, होण्याचा किमान आपण प्रयत्न करत राहाने हाच आपला ऊद्देश.
आपल्या समाजात, ग्रामिण भागात खुप मोठी बुद्दीमत्ता आहे. पण त्यांना आपण Class III or Class IV या नोकऱ्या मध्येच गुंडाळुन टाकतो किंवा त्यांचे लग्न करुन त्यांची आतली ऊर्जा तीथेच थांबवतो.