राष्ट्रवादी काँग्रेस ग्राम संवाद असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील निर्ली व धिडसी परिसरातील कार्यकर्त्यांचा ग्राम संवाद संपर्क अभियानांतर्गत जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र वैद्य विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांच्या निर्देशानुसार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर व राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विशाल कौरासे यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागातील कार्यकर्त्याची संवाद संपर्क बैठक धिडसी येथे आयोजीत करण्यात आली होती.
     या वेळी असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, दिनकर चटके, विठोबा कोंगरे, जितेंद्र चटके, संभा कौरासे, निलेश गानफाडे, उत्तम काळे, बंडू काळे, शंकर पाचभाई, बबन कौरासे, गोवर्धन झाडे, दिलीप वराडे, विठोबा वराडे, अंकुश डाखरे, साईनाथ कौरासे, सीताराम नागपुरे, गणेश कौरासे यांचेसह परिसरातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व परीसरातील गावकरी उपस्थीत होते.