सावली पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- "पत्रकार हा समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी झटत असतो. ते करताना स्वतःच्या प्रकृती कडे दुर्लक्ष होत असते. मराठी पत्रकार परिषदेचा ८२ व्या वर्धापनदिन आरोग्य दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा होत असताना सावली पत्रकारांची तपासणी करण्याची संधी मिळाली हा चांगला योग जुळून आला आहे. पत्रकारांनी आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे. माझ्याकडून यापुढेही असेच सहकार्य मिळत राहील." असे विधान ग्रामीण रुग्णालय सावली चे वैधकीय अधिक्षक डॉ.भीमराव धुर्वे यांनी आरोग्य तपासणी निमित्त व्यक्त करताना केले.
            मराठी पत्रकार परिषदेचा 82 व्या वर्धापन आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन एस एम देशमुख यांनी केले होते. त्यानुसार त्यांच्यासह किरण नाईक, गजानन नाईक व इतर पदाधिकारी याच्या मार्गदर्शनखाली राज्यात पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय सावली व सावली तालुका पत्रकार संघा तर्फे पत्रकारांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, ऑक्सिजन लेव्हल तपासणी, नाडी तपासणी, त्वचा व इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. षडाकांत कवठे होते. तर डॉ भीमराव धुर्वे,ओमप्रकाश बाकड़े, पल्लवी जय मडावी ,संजय टेपपलवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार,सचिव प्रकाश लोनबले,माजी अध्यक्ष उदय गडकरी,उमेश वाळके,प्रवीण झोडे,प्रशांत तावाड़े आदीसह पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज बोम्मावार यांनी केले.संचालन प्रकाश लोनबले यांनी तर आभार उदय गडकरी यांनी मानले.