दुशांत निमकर "स्टेट आयकॉन रिसर्च अवॉर्ड" ने सन्मानित.

Bhairav Diwase
मानवसेवा विकास फाऊंडेशनने केला गौरव.
Bhairav Diwase. Dec 05, 2020
गोंडपिपरी:- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,भंगाराम तळोधी येथे विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेले दुशांत निमकर सर यांचे शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, संघटनात्मक कार्य बघता मानवसेवा विकास फाऊंडेशन अमरावतीने 'स्टेट आयकॉन रिसर्च अवॉर्ड-२०२० ने सन्मानित करण्यात आले आहे.कोरोना काळ असल्याने समारंभ आयोजित न करता मानपत्र व सन्मानचिन्ह घरपोच पाठवून गुणगौरव करण्यात आला आहे.

              महात्मा गांधीजी यांच्या १५१ व्या जयंतीवर्षं निमित्य ११ वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलन आयोजित करण्यात आले होते परंतू कोरोनासदृश परिस्थिती असल्याने मानपत्र व सन्मानचिन्ह घरपोच पाठविण्यात आले.मानवसेवा विकास फाऊंडेशन(NGO), साप्ताहिक ग्रामवैभव, इंटरनॅशनल ह्यूमन रिसर्च पब्लिकेशन द्वारा विविध क्षेत्रातील विशेष प्रशंसनीय कार्य करणाऱ्या, जनसेवा करणाऱ्या तथा कोरोना काळात विविध सेवा देणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तींना पुरस्कार वितरण करण्यात आले यात जिल्ह्यातील दुशांत निमकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.

           दुशांत निमकर हे शैक्षणिक कार्यासोबत विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विधायक कार्य करीत असतात. सोबतच ते संघटनात्मक,साहित्यिक कार्यातून समाजाची वास्तव स्थिती व विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नरत असतात.विविध अभिनव उपक्रमाने ते जिल्ह्यात परिचित आहेत त्यामुळे या सर्व कार्याची दखल घेत मानवसेवा विकास फाऊंडेशन,अमरावती तथा निवड समिती अध्यक्ष मा.डॉ.नंदकिशोर अरुण पाटील व इतर पदाधिकारी यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले.दुशांत निमकर यांना शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.यात 'स्टेट आयकॉन रिसर्च अवॉर्ड'ने भर पडली असल्याने मित्र परिवार, नातेवाईक, शिक्षक, कवी, लेखक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.