ग्राम पंचायत च्या कारभारात नावरोबाना तालीम देण्याची मागणी.
कोणी भोगवस्तू समजोनि भली! सजवोनि ठेविली नुसती बाहुली!!
त्याने घरोघरी शिरला कली ! अबला बनली मायभूमी!!
परभणी:- राणी सावरगाव (परभणी जिल्हा) दिनांक 15 जानेवारी 2019 रोजी ज्या महिला निवडून आलेल्या आहेत त्या काही शिक्षित तर काही अशिक्षित तसेच अनुभव शून्य आहेत. मागील अनुभवावरून असे लक्षात आले आहे की ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य महिलांनी सक्रियपणे जबाबदाऱ्या पार पाडायला हव्या होत्या त्या पार न पाडता त्यांच्या वतीने त्यांचे नवरे कार्यरत अर्थात हस्तक्षेप करत होते. नागरगोजे यांनी मांडले मत
१)निवडून आलेल्या महिला "नंदिबैल" व 'बाहुली" म्हणजेच अकार्यक्षम बनतात. अर्थात त्यांच्यात कसल्याही प्रकारचे ज्ञान व कौशल्य विकसित होत नाही.
२)मासिक बैठकांना व ग्रामसभांना गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढते. त्यांना सभेत उत्तरे देता येत नाहीत. केवळ सह्याजीराव बनतात.
३)पुरुषांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे भ्रष्टाचार वाढत जातो, विकासाची कामे निकृष्ट होतात किंवा अर्धवट होतात किंवा होतच नाहीत.
४) नातेसंबंधातील किंवा जवळच्याच माणसांची कामे केली जातात.
५)अनेक प्रसंगी स्त्रियांऐवजी कामे करणाऱ्या पुरुषांमध्ये विसंवाद वाढून, स्वार्थापोटी गुंडगिरीपणा वाढून हिंसात्मक वळण लागते.
६)ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अकारण दबावतंत्राचा वापर करून त्यांना परेशान केले जाते.
७) ग्रामपंचायत कार्यप्रणालीतील पारदर्शकता संपुष्टात येते.
वरील मुद्द्यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेता आदर्श ग्रामपंचायत बनण्यापासून गाव वंचित राहू नये. यासाठी पुरुषप्रधान संस्कृतीचा शिरकाव होऊ देऊ नये.स्त्रियांच्या ऐवजी पुरुषांचा हस्तक्षेप होत असेल तर "कार्यालयीन कामकाजात अडथळा" याखाली सक्त कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून महिला सदस्य बेजबाबदार व अकार्यक्षम राहणार नाहीत. अशी मागणी नागरगोजे यांनी केली
हस्तक्षेप रोखण्यास आपण कमी पडलात तर संबंधित व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाईल. असेही ते म्हणाले