चंद्रपूर जिल्हा युवा मोर्चाच्या माध्यमातून बल्लारपूर शहरात मा. गृहमंत्री अनिल देशमुख यांना बॅनर दाखवून निषेध.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 22, 2021
बल्लारपूर:- आज दिनांक 22 जानेवारी 2021 ला चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात महाराष्ट्राचे गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख यांचे कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यात आगमन झाले यावेळी जिल्ह्यातील अनेक समस्यांवर वाढत्या महिला अत्याचाराच्या समस्या, अवैध दारू विक्रीची समस्या, वाढल्या गुन्हेगारीची समस्या किंवा पत्रकारांवर सातत्याने होणार्‍या हल्ल्यांच्या समस्या अशा अनेक समस्या या चंद्रपूर जिल्ह्यात असताना फक्त आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आलेल्या मंत्र्यांना युवा मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यातील वाढत्या अपराधावर जाब विचारणारे बॅनर दाखवून निषेध करण्यात आला.


महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार व चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आले. याप्रसंगी जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिन डोहे, विशाल शर्मा, जिल्हा सचिव ओम पवार, राहुल बिसेन, विद्यार्थी आघाडी सहसंयोजक प्रतीक बारसागडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे, पवन दिवेदी, मनीष रामिल्ला, संजय बाजपेई मोहित डंगोरे, श्रीकांत आंबेकर, राजेश कैथवास, श्रीकांत उपाध्याय, रिंकू गुप्ता, ट्रान्सपोर्ट गाडी सेल तालुकाध्यक्ष गुलशन शर्मा, निलेश कटरे, कुणाल शिरसागर, अदनान शेख, शीराज शेख, अनिल मजुमदार,सुरज मंडल त्याचबरोबर अनेक युवा मोर्चा कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले.