ग्रामपंचायत गोवरी भीमराव मिट्टूवार चौथ्यांदा विजयी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- अकरा सदस्य असलेल्या गोवरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भीमराव मिट्टूवार हे सलग चौथ्यांदा निवडून आले असून त्यांनी प्रभाग क्र. 4 मधून सोबतीला असलेल्या दोन उमेदवारांना सुद्धा निवडून आणण्याची किमया केली आहे. 
           राजुरा तालुक्यातील गोवरी ग्रामपंचायतीवर सण 2005 पासून भाजपाचे एकछत्री राज्य होते. तालुक्यातील भाजप अध्यक्ष व विद्यमान जि. प. चे कृषी सभापती श्री सुनील उरकुडे यांचा नेतृत्वात गोवरी ग्रामपंचायत वाटचाल करीत होती. परंतु 2020-2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा सपशेल पराभव झाल्याने ही ग्रामपंचायत ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या ताब्यात गेली आहे.
                भीमराव मिट्टूवार हे सण 2005 पासून भाजपा कडून लढले व प्रत्येक निवडणुकीत स्वतःसोबत दोन उमेदवार निवडून आणण्याची किमया त्यांनी केली होती. परंतु यावेळेला त्यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाचे तिकीट घेऊन काँग्रेस, शेतकरी संघटना युतीच्या ग्रामविकास परिवर्तन आघाडीतर्फे प्रभाग 4 मधून निवडणूक लढवली व चौथ्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. भीमराव मिट्टूवार हे यापूर्वी 2005 पासून ते 2010 पर्यंत गोवरीचे उपसरपंच होते. त्यांचा गोवरी येथे पानठेल्याचा व्यवसाय असून मनमिळाऊ स्वभावामुळे ते जनसामान्यांत लोकप्रिय आहे. सातत्याने निवडून येणारे भीमराव मिट्टूवार येणाऱ्या काळात सरपंच होतील काय ? याकडे गोवरी येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.