जिवती तालुक्यातील भुमिहिन शेतकऱ्यांना शेतीचे जमीन पट्टे मिळण्याबाबत विदर्भ राज्य आंदोलन समिती कडुन पालकमंत्री यांना निवेदन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तिन पिढ्यांच्या पुराव्यांची अट रद्द करुन जिवती तालुक्यातील भुमिहिन शेतकऱ्यांना शेतीचे जमीन पट्टे मिळण्याबाबत विदर्भ राज्य आंदोलन समिती अध्यक्ष श्नी सुदामभाऊ राठोड यांच्या कडुन जिल्ह्याचे पालकमंत्री ना मा. श्नी ना विजय भाऊ वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले.
 
     जिवती तालुक्यातील शेतकरी १९५० ते १९५५ पासून शेती व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करीत आहे तरी आतापर्यंत या क्षेत्रातील भुमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीन पट्टे मिळालेले नाही म्हणून या शेतकऱ्यांना शासनाची कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही कारण प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन पट्टे असणे अनिवार्य आहे असे मांडत पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले या वेळी अध्यक्ष श्नी सुदामभाऊ राठोड विशाल राठोड अमोल बर्दाडकर निखिल डांगे शुभम वाळदे इ.मान्यवराच्या उपस्थितीत आमची मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला.