Top News

शेतशिवारातील सागवन पानझळ विसरते तेव्हा...…....


महेन्द्रसिग् चंदेल यांची नवलाई

वार्ता विशेष/महेश पानसे


कोरोना विषाणू संसर्ग काळात काम,व्यापार,सारे मंदावले.हा सिलसिला गत दिड वषांपासून सुरू आहे.या काळात आपापले चांगले छंद जोपासून वेळ घालवावा असा सल्ला सारेच देताना दिसले.मात्र गत अनेक सालापासून व्यापार सांभाळणाऱ्यांनी घरात तरी काय करावे. गोंडपिपरी येथील प़तिष्टीत व्यापारी महेद़सिंह चंदेल यांनी चक्क आपल्या शेतशिवारातील ३ एकरातील पळसबागेत सारा वेळ वनराईत घालवून, अक्षरशा आकषंक, आल्हाददायक हरीतवन बहरवले. गोंडपिपरी-अहेरी महामार्गानी ये जा करणात्तांची द्धिष्ट लागावी अशी ही संपदा सजविताना कुण्या गडयाचीही मदत घेतली नाही हे विशेष. भर उन्हाळ्यातही चंदेल यांनी दोन एकरातील सागवानाची अशी निगा घेतली की हा सागवन आपली पानझळ विसरला.


सारा परिसर कोरोना काळात टेंशन सांभाळत असताना चंदेल मात्र पहाटेपासून सुयांस्तापयंत आपल्या या नव्या परिवारासोबत प़फुल्लीत होत राहिले. गोंडपिपरी-अहेरी महामागं चौफेर जंगल रानांनी वेढले आहे. या जंगलात विशेषतः सागवान या जातीची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.हे संपुर्ण वन पानझडीने आओसाडले असताना चंदेल यांच्या सहवासात त्यांची साग व पळसबाग चमत्कारीकरित्या हिरवेकंच राहीले. गोंडपीपरी पासून काही अंतरावर सुरगाव या गावाजवळ गोंडपिपरी येथील प्रतिष्ठित नागरिक महेंद्रसिंह चंदेल यांचा तीन एकर क्षेत्रात फार्म हाऊस (शेतशिवार) आहे. त्या फार्म हाऊस मधील दोन एकर जागेवर सागवान आणि एक एकर मध्ये फुलं झाडे लावली आहेत.चंदेल यांचा मानस होता की,उन्हाळ्यात या झाडांची पाने झडतात,करपतात तेव्हा आपण या तप्त वातावरणाच्या आणि उकाड्याच्या दिवसात झाडांना ईतर ऋतुप्रमाने या लाकडाऊन काळात हिरवेगार ठेवू .दृढ निश्चय करून चंदेल यांनी स्वतः झाडांना रोज आणि वेळेवर खत,पाणी या गोष्टी न चुकता पुरवित होते,त्या परिश्रमाचे फलित आज उष्ण वातावरणात सुद्धा संपूर्ण झाडे हिरवीगार आणि फुलं झाडे फुलांनी बहरून डौलाने उभी आहेत. विशेष म्हणजे गडीमाणसांची विशेष मदत न घेता एका प़तिष्टीत युवा व्यापाऱ्याने नवा छंद जगासमोर ठेवून संकटकाळात निसगंच आपला सखा हे आपल्या प़त्यक्ष कुतीतून दाखवून दिले आहे.

महेंद़सिंह चंदेल यांनी आपुलकी दाखविली अन तिन एकरातील वनराई आपली पानझळ विसरली,आहे ना नवल!
*****************************

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने