दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक.

Bhairav Diwase
हेही पहा:-
पोंभुर्णा:- मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोंभुर्णा-उमरी पोतदार मार्गावर घनोटी नं 2 गावाजवळ MH 34 AF 5546 आणि MH 33 B 5688 दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक दिल्याने अंकुश आणि राहुल 2 जण जखमी झाला. या अपघातात अंकुश मारोती आलाम मु. घनोटी नं 2 हा व्यक्ती गंभीर जखमी झाला. तर राहुल मधुकर मेश्राम रा. मुरखडा ता. चामोर्शी हा जखमी झाला. हा घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून दोघांना पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार करुन सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास उमरी पोतदार पोलिस करीत आहेत.