(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आज दिनांक 24 जून रोजी "आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद" "राष्ट्रीय बजरंग दल" वर्धापन दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या परिसरात, भिन्न प्रकारचे कार्यक्रम पार पडले गेले.
तसेच आज आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल तर्फे चंद्रपूर महानगर येथे गरजू रुग्णांना रक्तदान करून त्यांना सहकार्य केले.
केंद्र सरकारने घरोघरी कोरोनाची लस देण्याची मोहीम राबवली आहे. परंतु लस घेतल्यानंतर जवळपास २ ते ३ महिने रक्तदान करता येणार नाही परंतु भविष्यात कोणालाही कधीही रक्त दात्याची गरज भासू शकते अश्यात युवा वर्गाने तसेच ज्यांनी लस घेतली नाही अश्या नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकून शासकीय रक्तपेढी येथे रक्तदान करून आपला मौलाचा वाटा अंकित करावा नव्या तरुणांना रक्त दान बद्दल जागृत करणे खूप अतिशय गरजेचं आहे, सर्व युवा वर्गानी सकारात्मक विचारलं अंगीकृत करून एक पाऊल पूढे घ्या आणि आजच्या अश्या चिंताजनक स्थिती मध्ये रक्तदान करून समाजात आपली छाप सोडली पाहिजे.
हा कार्यक्रम विभाग अध्यक्ष नंदूभाऊ गट्टूवार राष्ट्रीय बजरंग दल नेता यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अंकित भाऊ जोगी आणि चंद्रपूर जिल्हा प्रभारी रोशन भाऊ राठोड आणि चंद्रपूर महानगर महामंत्री हेमंतजी बोमिडवार यांच्या अध्यक्षतेखाली व यांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला गेला.