Top News

अबब..... चक्क सापाने गिळले कोंबडीचे दहा अंडे अन् पुन्हा ओकले. #snake


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- मूल तालुक्यातील लहान कोसंबी येथे गव्हाऱ्या नागाने कोंबडीचे चक्क दहा अंडे गिळले. ते अंडे पचविणे अशक्य झाल्याने ते काही वेळाने त्याने पुन्हा ओकून बाहेर काढले. सध्या या घटनेची चर्चा चांगलीच रंगली आहे. ही घटना काल रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. सर्प मित्रांनी पकडलेल्या सापाला मारोडा जंगलात सुखरूप सोडण्यात आले.

चेक आष्टा फाट्याजवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात.

मूल पासून सहा किमी अंतरावर असलेल्या लहान कोसंबी येथील पवन लोनबले यांच्या घरी रात्री साडे आठ वाजता गव्हाऱ्या जातीच्या विषारी सापाने घरात प्रवेश केला. घराच्या एका कोपऱ्यात पिल्ले फोडण्यासाठी मोठ्या टोपलीत कोंबडी अंड्यावर बसली होती.

सापाने थेट कोंबडीच्या दिशेने आपला मोर्चा वळविला. सापाला पाहताच कोंबडी भीतीने पळाली. कोंबडीच्या फडफडण्याचा आवाज ऐकून लोनबले कुटुंबीयांनी धाव घेतली असता त्यांना चक्क सापाचे दर्शन झाले.

दरम्यान त्यांनी लागलीच मूल येथील सर्पमित्र उमेश झिरे आणि तन्मय झिरे यांना माहिती दिली. सर्पमित्र येईपर्यंत सापाने कोंबडीच्या अकरा अंड्या पैकी दहा अंडयावर ताव मारला होता. तात्काळ दाखल झालेल्या तन्मय झिरे यांनी दहा अंडे गिळलेल्या आणि कोंबडीच्या शिकारीत बसलेल्या सापाला अलगद पकडले.

त्यांनंतर सापाने गिळलेले दहा अंडे क्षणार्धात तोंडा वाटे बाहेर ओकले. पावसाळी वातावरणामुळे सापाने घरात प्रवेश केला आणि अंड्यावर ताव मारला. अंड्यांची नासाडी झाली असली तरी लोनबले यांची कोंबडी मात्र बचावली. सापाला पकडण्यात आल्याने लोनबले कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटना पाहण्यासाठी गर्दी केली होती. पकडण्यात आलेला गव्हाऱ्या जातीचा विषारी साप साडे पाच फुटाचा होता. सापाची नोंद करून सर्पमित्र तन्मय झिरे यांनी सापाला मारोडा जंगलात सुखरूप सोडले.

#mulnews #mul #snake #Adharnewsnetwork #chandrapurnews

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने