Click Here...👇👇👇

नवीन सामाजिक सभागृहाच्या इलेक्ट्रिक फिटींग आणि जिना करीता निधी उपलब्ध. #pombhurna

Bhairav Diwase


माजी सरपंच हरीष ढवस यांच्या मागणीला यश.

भाजपा कार्यकर्त्यांनी मानले आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे आभार.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा येथे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नवीन सामाजिक सभागृह बांधकाम पूर्ण झाले होते. परंतु निधी कमी पडत असल्याने इलेक्ट्रिक फिटींग आणि जिना यांचे काम रखडले. माजी सरपंच हरीष ढवस यांनी इलेक्ट्रिक फिटींग आणि जिना कामाकरीता आ. सुधीर भाऊ यांचेकडे निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्यक्ष भेटून मागणी केली. आ. सुधीर भाऊंनी माजी सरपंच हरीष ढवस यांच्या मागणीची दखल घेत इलेक्ट्रिक फिटींग आणि जिना काम पूर्ण करण्याकरिता निधी उपलब्ध करुन दिला.


आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे विकास दिवसे, विजय बोडेकार, गिरिधर तोरे, खुशवंत गेडाम, गणेश मोरे, सूरज बोडेकर, मिथुन दिवसे, विशाल दिवसे, अतुल ताजने, देवराव खुजबुरे,तेजराज दिवसे, विकास गेडाम, आदींनी आभार मानले.

#chandrapur #bjppombhurna #bjpchandrapur #pombhurnanews #pombhurna #mlasudhirbhau